लख्वीला भारताच्या स्वाधीन करा
By Admin | Updated: January 20, 2015 01:38 IST2015-01-20T01:38:38+5:302015-01-20T01:38:38+5:30
भारताबरोबरचे संबंध सुधारण्यासाठी मुंबई हल्ल्याचा (२६/११) सूत्रधार झकिऊर रेहमान लख्वी (५४) याला भारताच्या हवाली करा, अशी मागणी अमेरिका आणि इंग्लडने पाकिस्तानकडे केली आहे.

लख्वीला भारताच्या स्वाधीन करा
इस्लामाबाद : भारताबरोबरचे संबंध सुधारण्यासाठी मुंबई हल्ल्याचा (२६/११) सूत्रधार झकिऊर रेहमान लख्वी (५४) याला भारताच्या हवाली करा, अशी मागणी अमेरिका आणि इंग्लडने पाकिस्तानकडे केली आहे.
इस्लामाबाद उच्च न्यायालयात सोमवारी लख्वीच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरू असताना सरकारी वकिलाने दोन देशांनी लख्वीला भारताकडे सोपवावे अशी मागणी केल्याचे सांगितले. मात्र त्यांची नावे वकिलाने न्यायालयाला सांगितली नाहीत. अमेरिका आणि इंग्लडने नवाज शरीफ सरकारने भारताशी संबंध सुधारण्यासाठी लख्वीला भारताकडे सोपवावे किंवा मुंबई हल्ल्यात अनेक देशांचे नागरिक ठार झाल्यामुळे ‘स्वतंत्र खटल्यासाठी’ आमच्याकडे द्यावे, अशी मागणी केली आहे, असे पाकच्या गृह मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले. सरकारी वकिलाने खंडपीठाकडे या खटल्याची सुनावणी वेगाने व्हावी अशी विनंती केली आहे. यावर न्यायमूर्ती म्हणाले,‘‘सरकार जर एवढ्या घाईत असेल तर खटला लष्करी न्यायालयाकडे सोपवावा.’’ लख्वीला कोणत्याही देशाकडे सोपवायचे की नाही हा ‘राजनैतिक प्रश्न’ असून संबंधित न्यायालयाशी त्याचा काही संबंध नाही, असेही त्यांनी म्हटले. (वृत्तसंस्था)
च्लाहोर : लख्वी आणखी एक महिना तुरुंगातच राहणार आहे. पाक सरकारने सार्वजनिक सुरक्षा कायद्याखालील त्याची स्थानबद्धता एक महिन्याने वाढवली आहे. लाहोर उच्च न्यायालयात सोमवारी लख्वीच्या स्थानबद्धतेबाबतची सुनावणी पुन्हा सुरू झाली. तेव्हा सरकारने लख्वीची स्थानबद्धता आणखी एक महिन्याने वाढविण्यात आली असल्याचे न्यायालयास सांगितले.