लाखभर शेतकरी दुष्काळी मदतीपासून वंचित
By Admin | Updated: March 14, 2015 23:45 IST2015-03-14T23:45:39+5:302015-03-14T23:45:39+5:30
लाखभर शेतकरी दुष्काळी मदतीपासून वंचित

लाखभर शेतकरी दुष्काळी मदतीपासून वंचित
ल खभर शेतकरी दुष्काळी मदतीपासून वंचित८० टक्के शेतकर्यांनाच मदत, शासनाकडून निधीच मिळेनाऔरंगाबाद : राज्य सरकारने दुष्काळग्रस्त शेतकर्यांसाठी आर्थिक मदतीचे पॅकेज दिले असले तरी जिल्ह्यातील सुमारे ९५ हजार शेतकरी अद्यापही मदतीपासून वंचित आहेत. शासनाकडून ८० टक्केच निधी मिळाल्याने जिल्ह्यातील ४ लाख ८४ हजार शेतकर्यांनाच ही मदत मिळालेली आहे. उर्वरित शेतकर्यांसाठी शासनाकडून निधी उपलब्ध न झाल्यामुळे या शेतकर्यांना मदत मिळालेली नाही.औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकरी सलग तीन वर्षांपासून नैसर्गिक संकटांचा सामना करीत आहेत. गतवर्षी फेबु्रवारी महिन्यात मोठ्या प्रमाणावर गारपीट आणि अवकाळी पावसामुळे रबी पिकांचे नुकसान झाले. त्यानंतर दुष्काळामुळे खरीप हंगामही गेला. आता रबी हंगामात पुन्हा गारपीट आणि अवकाळी पावसाचे संकट उभे आहे. जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. या नुकसानीपोटी शेतकर्यांना शासनाने मदत देण्याची मागणी होत आहे. दुसरीकडे अनेक शेतकर्यांना शासनाने आधी जाहीर केलेली दुष्काळी मदतही मिळालेली नाही. खरीप हंगामाच्या नुकसानीपोटी शासनाने डिसेंबरअखेरीस शेतकर्यांसाठी वैयक्तिक मदतीचे पॅकेज जाहीर केले होते. औरंगाबाद जिल्ह्यातील ५ लाख ८० हजार शेतकरी या मदतीसाठी पात्र ठरले. त्यांच्यासाठी एकूण २८८ कोटी रुपयांच्या निधीची गरज होती; परंतु शासनाने दोन टप्प्यात यातील ८० टक्केच म्हणजे २३९ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. या निधीचे वाटप नुकतेच पूर्ण झाले. त्यातून जिल्ह्यातील ४ लाख ८४ हजार शेतकर्यांनाच मदत मिळाली. अजूनही ९५ हजार शेतकरी मदतीपासून वंचित आहेत. त्यांच्यासाठी तिसर्या टप्प्यात निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मात्र, दुसर्या टप्प्याचे वाटप पूर्ण होऊनही तिसर्या टप्प्यातील निधी शासनाने उपलब्ध करून दिलेला नाही. मदतीपासून वंचित असलेल्या शेतकर्यांमध्ये औरंगाबाद तालुक्यातील १८ हजार, पैठणमधील ८ हजार, फुलंब्रीतील ३ हजार, वैजापूर १९ हजार, गंगापूर ८ हजार, खुलताबादेतील ५ हजार, तर सिल्लोडमधील २५ हजार आणि कन्नड तालुक्यातील १९ हजार शेतकर्यांचा समावेश आहे. तालुकाएकूण शेतकरीमदत मिळालेले शेतकरीऔरंगाबाद६२,७५६ ४४,४५५ पैठण ८२,८२९ ७४,८२९फुलंब्री४६,०४७ ४२,७३८वैजापूर१०,०५९३ ८१,७७४गंगापूर७७,००४ ६९,१०७खुलताबाद२७,३१८ २२,७२६सिल्लोड७४,१७९ ५५,११३कन्नड ८३,४६९ ६४,२८४सोयगाव२६,७२१ २६,७२१-------------------------------------------एकूण ५,८०,९१६ ४,८५,८३७-------------------------------------------