शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
2
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
3
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
4
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
5
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
6
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
7
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका
8
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
9
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
10
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
11
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
12
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
13
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
14
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
15
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
16
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
17
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
18
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
19
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
20
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड

देशात दरवर्षी लाखावर आत्महत्या; महाराष्ट्रात सर्वाधिक

By admin | Updated: July 4, 2014 09:31 IST

देशात दरवर्षी सरासरी एक लाखावर लोक आत्महत्या करतात. चिंतेची बाब म्हणजे गेल्या दशकाच्या तुलनेत त्यात २१.६ टक्के वाढ झाली.

नवी दिल्ली : देशात दरवर्षी सरासरी एक लाखावर लोक आत्महत्या करतात. चिंतेची बाब म्हणजे गेल्या दशकाच्या तुलनेत त्यात २१.६ टक्के वाढ झाली. २०१३ मध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक आत्महत्यांची नोंद झाली. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाने(एनसीआरबी) ‘क्राईम इन इंडिया २०१३’ या शीषर्काखाली गेल्या आठवड्यात जारी केलेल्या अहवालात ही आकडेवारी समोर आली आहे.गेल्यावर्षी आत्महत्येच्या घटनांची संख्या १,३४,७९९ नोंदण्यात आली असून, दशकापूर्वी म्हणजे २००३ मध्ये ही संख्या १,१०,८५१ एवढी होती. मधल्या काळाच्या तुलनेत २०११ नंतर आत्महत्यांचा दर कमी झाल्याचा दावाही या अहवालात करण्यात आला. त्याचे कारण या दशकाच्या काळात लोकसंख्येत १५ टक्के वाढ झाली असताना आत्महत्यांचा दर ५.७ टक्क्यांनी वाढला आहे.(आत्महत्येचा दर २००३ मध्ये १०.४ टक्के होता तो २०१३ मध्ये ११ टक्क्यांपर्यंत वाढला.) गेल्या दशकात आत्महत्येच्या दरात घट आणि वाढ अशी संमिश्र नोंद झाली. गेल्यावर्षी १६,६२२ आत्महत्यांची नोंद झालेले महाराष्ट्र देशात अग्रक्रमावर आहे. त्यापाठोपाठ १६,६०१ आत्महत्या झालेल्या तामिळनाडूचा नंबर लागतो. या दोन राज्यांमधील आत्महत्यांचे प्रमाण १२.३ टक्के आहे. महाराष्ट्र,तामिळनाडूपाठोपाठ आंध्र प्रदेश, प.बंगाल, कर्नाटक यांचे स्थान आहे. या पहिल्या पाच क्रमांकाची राज्यांमधील आत्महत्यांचे प्रमाण ५३.५ टक्के आहे. अन्य ४६.५ टक्के आत्महत्या उर्वरित २३ राज्ये आणि सात केंद्रशासित प्रदेशांमधील आहेत. गेल्यावर्षी चेन्नईत सर्वाधिक २४५० आत्महत्या झाल्या असून, १३२२ आत्महत्यांची नोंद झालेल्या मुंबईचा चौथा क्रमांक लागतो. देशातील प्रमुख ५३ शहरांच्या तुलनेत चार महानगरांमधील आत्महत्यांचे प्रमाण ३५ टक्के आहे, हे विशेष. (लोकमत न्यूज नेटवर्क)