शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Lakhimpur Violence Case: मोठी बातमी! शेतकऱ्यांना चिरडल्याचा आरोप असलेल्या मंत्री पुत्राला मिळाला जामीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2022 14:22 IST

Lakhimpur Violence Case: केंद्रीय गृहराज्य मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा याला अलाहाबाद न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने जामीन मंजूर केला आहे.

अलाहाबाद: लखीमपूर खेरी (Lakhimpur Violence Case) येथे शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडल्याच्या कथित आरोपाखाली तुरुंगात असलेल्या केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा(Ajay Mishra) यांचा मुलगा आशिष मिश्रा(Ashish Mishra) याला उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या (Allahabad High Court)लखनौ खंडपीठाने आशिष मिश्राला जामीन मंजूर केला आहे. उच्च न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर आशिष मिश्रा उद्या म्हणजेच 11 फेब्रुवारीला तुरुंगातून बाहेर येईल.

हिंसाचारात आठ जणांचा मृत्यू

लखीमपूर हिंसाचार प्रकरणी केंद्रीय मंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा याला अलाहाबाद उच्च न्यायालयातून जामीन मिळाला आहे. निवडणुकीच्या वातावरणात आशिष मिश्रा याला जामीन मिळाल्याने आता याचा फायदा कोणत्या पक्षाला होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान गेल्या वर्षी 3 ऑक्टोबर रोजी तिकोनिया निघासन विधानसभा मतदारसंघात चार शेतकऱ्यांसह आठ जणांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी टेनीचा मुलगा आशिष याला मुख्य आरोपी म्हणून अटक करण्यात आली होती.

पाच हजार पानांचे आरोपपत्र

हिंसाचाराच्या प्रकरणात एसआयटीने आरोपपत्र दाखल केले होते. 5000 पानांच्या या आरोपपत्रात केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांचा मुलगा आशिष मिश्रा उर्फ ​​मोनू भैया याला मुख्य आरोपी बनवण्यात आले आहे. आशिष मिश्रासह 16 जणांना आरोपी करण्यात आले आहे. गेल्या वर्षी 3 ऑक्टोबर रोजी आशिष मिश्रा समर्थक आणि शेतकऱ्यांमध्ये झालेल्या संघर्षात आठ जणांचा मृत्यू झाला होता. तपास अधिकाऱ्यांनी आशिष मिश्रासह अन्य आरोपींना हत्येचा आरोपी बनवले आहे. आरोपपत्रानुसार सुनियोजित कटाखाली आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना जीप आणि एसयूव्हीने चिरडले.

208 जणांनी नोंदवली साक्ष

तपासात, एसआयटीला 17 वैज्ञानिक पुरावे, सात भौतिक पुरावे आणि 24 व्हिडिओ फोटो सापडले, ज्यामुळे आरोपींच्या अडचणी वाढल्या. याशिवाय 208 जणांनी साक्ष दिली. या आधारे एसआयटीने आरोपपत्र दाखल केले. मंत्र्यांचा मुलगा आशिष घटनास्थळी उपस्थित असल्याचे साक्षीदारांनी एसआयटीला सांगितले. शेतकऱ्यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे आशिष मिश्रा आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न अशा अनेक गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

टॅग्स :Lakhimpur Kheri Violenceलखीमपूर खीरी हिंसाचारCourtन्यायालय