शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Lakhimpur Kheri Updates: शेतकऱ्यांच्या मृत्यूमुळे देशभरात संताप; UP सरकारकडून मृतांच्या कुटुंबीयांना ४५ लाख आणि नोकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2021 08:09 IST

वातावरण शांत करण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना ४५ लाख, कुटुंबातील एका व्यक्तीस नोकरी आणि जखमींना १० लाख रुपये अशी घोषणा केली आहे

ठळक मुद्देमृतांच्या नातेवाईकांना भेटण्यास  जाऊ पाहणाऱ्या काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी व सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांना पोलिसांनी अटक केलीराज्यात विधानसभेच्या निवडणुका सहा महिन्यांवर असताना हे घडल्याने भाजप नेते हादरले आहेत.केंद्रीय राज्यमंत्री अजय मिश्र यांना मंत्रिपदावरून हटवावे व त्यांचा मुलगा आशिष मिश्र याला अटक करावी

लखनऊ : लखीमपूर खेरी येथे रविवारी शेतकऱ्यांच्या निदर्शनांवेळी झालेल्या हिंसाचारात आठ जण ठार झाल्यामुळे देशभर संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी, सोमवारी सर्वत्र राजकीय पक्ष व शेतकरी संघटनांनी निदर्शने केली. पोलिसांनी केंद्रीय गृहराज्य मंत्री अजय मिश्र यांच्या मुलाविरुद्धही गुन्हा नोंदविला आहे.

वातावरण शांत करण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना ४५ लाख, कुटुंबातील एका व्यक्तीस नोकरी आणि जखमींना १० लाख रुपये अशी घोषणा केली आहे. झाल्या प्रकाराची उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशाद्वारे चौकशी केली जाईल. केंद्रीय मंत्री अजय मिश्र यांच्या मुलास अटक करावी, अशी मागणी काँग्रेस व शेतकरी संघटनांनी केली आहे. त्यानेच शेतकऱ्यांच्या अंगावर वाहन घातले, असा आरोप आहे. मृतांच्या नातेवाईकांना भेटण्यास  जाऊ पाहणाऱ्या काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी व सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांना पोलिसांनी अटक केली. राज्यात विधानसभेच्या निवडणुका सहा महिन्यांवर असताना हे घडल्याने भाजप नेते हादरले आहेत. शेतकऱ्यांवर केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांच्या मुलाने वाहन घातल्याने चार जण मरण पावले, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. 

प्रियांका गांधींनी पोलिसांना सुनावलेप्रियांका गांधी यांना रविवारी मध्यरात्री लखनऊमध्ये अडवण्यात आले. तेथून त्या पुढे निघाल्यानंतर सीतापूर येथे अडवण्यात आले. मात्र, पोलिसांकडे अटक वॉरंट नव्हते. तिथे महिला पोलीसही नव्हत्या. अशा स्थितीत तुम्ही आपणास अटक करू शकत नाही, असे प्रियंका यांनी पोलिसांना ऐकवले. त्यामुळे नंतर त्यांना वॉरंट व महिला पोलीस यांच्या उपस्थितीत अटक करण्यात आली.

मिश्र यांना मंत्रिपदावरून हटवा : टिकैतकेंद्रीय राज्यमंत्री अजय मिश्र यांना मंत्रिपदावरून हटवावे व त्यांचा मुलगा आशिष मिश्र याला अटक करावी, अशी मागणी शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी केली आहे. माझ्यावरचे आरोप खोटे असून शेतकरी आंदोलन सुरू असलेल्या जागी आपण उपस्थित नव्हतो, असा दावा आशिष मिश्र यांनी केला आहे. 

छावणीचे स्वरूपलखीमपूरमध्ये प्रचंड पोलीस बंदोबस्त असून, तिथे धडक कृती दलाच्या तुकड्या ठेवण्यात आल्या आहेत. तिथे सध्या शांतता आहे. पण, लखनऊसह उत्तर प्रदेशातील सर्व जिल्हय़ांत आज उग्र निदर्शने झाली. अखिलेश यादव यांना अटक करण्यात आली, तेव्हा तिथे त्यांचे हजारो समर्थक जमले होते. त्यांनी पोलिसांची जीपच जाळली. लखीमपूरला विरोधी नेत्यांना येण्यास पोलिसांनी बंदी घातली आहे. त्यामुळे उत्तराखंडचे मुख्यमंत्री भूपेश बाघेल व पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी जाऊ शकले नाहीत. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशFarmers Protestशेतकरी आंदोलन