लकडगंज, प्रतापनगरात धाडसी घरफोडी
By Admin | Updated: July 31, 2015 23:03 IST2015-07-31T23:03:07+5:302015-07-31T23:03:07+5:30
रोख आणि दागिने लंपास

लकडगंज, प्रतापनगरात धाडसी घरफोडी
र ख आणि दागिने लंपास नागपूर : लकडगंज आणि प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत धाडसी घरफोडीच्या दोन घटना घडल्या. चोरट्यांनी दोन्ही ठिकाणांहून रोख आणि दागिन्यांसह एकूण साडेचार लाखांचा ऐवज लंपास केला. निकालस मंदिर मार्गावर राहणाऱ्या सपना राजेद्रकुमार जैन (वय ४०) या त्यांच्या निद्रिस्त असताना शुक्रवारी पहाटे २ च्या सुमारास चोरटा किचनच्या खिडकीतून आत शिरला. त्याने घरातील कपाटात ठेवलेले रोख २ लाख आणि सोन्याचे दागिने असा एकूण ३ लाख, ४४ हजारांचा ऐवज चोरून नेला. सकाळी ६,३० वाजता ही घरफोडी उघडकीस आली. त्यानंतर जैन यांनी पोलिसांना माहिती दिली. लकडगंज पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला असून, चोरट्यांचा शोध घेतला जात आहे. अशाच प्रकारे लक्ष्मीनगरातील रहिवासी संध्या मैसारकर यांच्या दाराचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोख रक्कम, एलसीडी, कॅमेरा, घड्याळ आणि अन्य चिजवस्तूंसह १ लाख, ११ हजारांचा ऐवज लंपास केला. मैसारकर चार महिन्यांपुर्वी त्यांच्या जपानला राहणाऱ्या मुलाकडे गेल्या. शुक्रवारी सकाळी त्यांचे आतेभाऊ शैलेश वसंत काणे (वय ५२) हे मैसारकर यांच्या घराकडे गेले असता घरफोडी उघडकीस आली. काणे यांच्या तक्रारीवरून प्रतापनगर पोलिसांनी घरफोडीची नोंद केली. चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.---