लकडगंजमध्ये जबरी चोरी
By Admin | Updated: July 12, 2015 23:56 IST2015-07-12T23:56:40+5:302015-07-12T23:56:40+5:30
नागपूर : दुचाकीवरील महिलेच्या गळ्यातील ४० हजारांचे मंगळसूत्र मोटरसायकलवरील आरोपीने हिसकावून नेले. रविवारी सकाळी ८.३० वाजता सेंट्रल एव्हेन्यूवर ही घटना घडली. स्नेहा दिलीप वाटकर (वय ४५, रा. अयाचित मंदिर बस स्टॉपजवळ) या आपल्या मुलीसह दुचाकीने कळमना येथे जात होत्या. टेलिफोन एक्सचेंज चौकाजवळ मोटारसायकलवर आलेल्या एका आरोपीने वाटकर यांच्या गळयातील ४० हजारांचे मंगळसूत्र हिसकावून नेले. वाटकर यांच्या तक्रारीवरून लकडगंज पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला.

लकडगंजमध्ये जबरी चोरी
न गपूर : दुचाकीवरील महिलेच्या गळ्यातील ४० हजारांचे मंगळसूत्र मोटरसायकलवरील आरोपीने हिसकावून नेले. रविवारी सकाळी ८.३० वाजता सेंट्रल एव्हेन्यूवर ही घटना घडली. स्नेहा दिलीप वाटकर (वय ४५, रा. अयाचित मंदिर बस स्टॉपजवळ) या आपल्या मुलीसह दुचाकीने कळमना येथे जात होत्या. टेलिफोन एक्सचेंज चौकाजवळ मोटारसायकलवर आलेल्या एका आरोपीने वाटकर यांच्या गळयातील ४० हजारांचे मंगळसूत्र हिसकावून नेले. वाटकर यांच्या तक्रारीवरून लकडगंज पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला. ----