मध्यप्रदेशात शिव मंदिराजवळ लॅडस्लाईड

By Admin | Updated: March 7, 2016 16:50 IST2016-03-07T14:01:47+5:302016-03-07T16:50:32+5:30

मध्य प्रदेशातील छिंडवाडा येथील शिव मंदिराजवळ दरड कोसळून तीन भाविकांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

Ladleside near Shiva temple in Madhya Pradesh | मध्यप्रदेशात शिव मंदिराजवळ लॅडस्लाईड

मध्यप्रदेशात शिव मंदिराजवळ लॅडस्लाईड

ऑनलाइन लोकमत
छिंडवाडा, दि. ७ - मध्य प्रदेशातील छिंडवाडा येथील शिव मंदिराजवळ दरड कोसळून तीन भाविकांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. महाशिवरात्रीनिमित्त आज भाविकांनी मंदिरात ठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यामुळे अनेक भाविक दबले गेले, त्यातील तीन जणांचा मृत्यू झाला. आत्तापर्यंत एका भाविकाचे मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे.
जिल्हा मुख्यालयापासून सुमारे १०० किमी अंतरावर हर्रईपासून ३ किमी अंतरावर असलेल्या आंजनपूर येथे एका डोंगरातील गुफेत गेल्या अनेक वर्षांपासून शिवभक्त शिवरात्रीच्या पूजेसाठी येत असतात. मात्र आज सकाळी ११ च्या सुमारास अचानक दरड कोसळली आणि गुहेतील ८- १० भाविक दबले गेले. या दुर्घटनेची सूचना मिळताच जिल्हा मुख्यालयातील कलेक्टर, एसपी यांच्यासह अनेक अधिकारी घटनास्थळी पोहोचले. ढिगा-याखाली दबलेल्यांना बाहेर काढण्यासाठी जेसीबी मशीन्स लावण्यात आली असून तीन जण मृत्यूमुखी पडले आहेत. मृतांमध्ये पुजा-याचाही समावेश असल्याचे समजते. 
 
 

Web Title: Ladleside near Shiva temple in Madhya Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.