गुंतवणुकीवर दहापट परताव्याच्या आमिषाने साडेबारा लाखांची फसवणूक
By Admin | Updated: January 25, 2016 00:10 IST2016-01-25T00:10:12+5:302016-01-25T00:10:12+5:30
नाशिक : गुंतवणुकीवर दहापट परतावा व नोकरीचे आमिष दाखवून एका गुंतवणूकदारांची तब्बल साडेबारा लाखांची फसवणूक केल्याचे समोर आले असून, या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात जागृती ॲग्रो फुडच्या दोघा संचालकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

गुंतवणुकीवर दहापट परताव्याच्या आमिषाने साडेबारा लाखांची फसवणूक
न शिक : गुंतवणुकीवर दहापट परतावा व नोकरीचे आमिष दाखवून एका गुंतवणूकदारांची तब्बल साडेबारा लाखांची फसवणूक केल्याचे समोर आले असून, या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात जागृती ॲग्रो फुडच्या दोघा संचालकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ गंगापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जागृती ॲग्रो फुड या कंपनीचे संचालक संशयित राज गणपतराव गायकवाड (रा. पंढरपूर)व मदन ओतारी (रा. सांगली) यांनी सावरकरनगर परिसरातील बाळकृष्ण बाबूराव कोयटे यांनी गुंतवणुकीवर दोन वर्षांत दहापट परतावा व नोकरीचे आमिष दाखविले़ या आमिषाला भुलून कोयटे यांनी २५ सप्टेंबर २०१४ पासून या कंपनीत वेळोवेळी १२ लाख ५० हजार रुपयांची गुंतवणूक केली़ मात्र, कंपनीचे संचालकांनी दिलेल्या आश्वासनापैकी कोयटे यांना ना नोकरी मिळाली ना गुंतवणुकीचा परतावा़ याबाबत कोयटे यांनी कंपनीच्या संचालकांकडे गुंतवणूक केलेल्या रकमेची मागणी केली असता त्यांनी टाळाटाळ केली़ कोयटे यांना फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी रविवारी (दि़२४) गंगापूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन कंपनीचे संचालक गायकवाड व ओतारी यांच्याविरुद्ध फसवणुकीची फिर्याद दिली़ (प्रतिनिधी)