मोरजीत पर्यटकांसाठी पार्किंग सुविधेचा अभाव
By Admin | Updated: February 18, 2015 00:13 IST2015-02-18T00:13:12+5:302015-02-18T00:13:12+5:30
फोटो ओळ : तेंबवाडा किनारी पार्किंगची गंभीर समस्या. (छाया: निवृत्ती शिरोडकर)

मोरजीत पर्यटकांसाठी पार्किंग सुविधेचा अभाव
फ टो ओळ : तेंबवाडा किनारी पार्किंगची गंभीर समस्या. (छाया: निवृत्ती शिरोडकर)पेडणे : पर्यटन हंगामातून सरकारला करोडो रुपये महसूल मिळतो. मात्र, पर्यटकांच्या वाहनांसाठी मोरजी किनारी सुरक्षित जागाच उपलब्ध नाही. त्यामुळे पार्किंगची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्याकडे संपर्क साधला असता त्यांनी मांद्रे मतदारसंघातील मोरजी, आश्वे, मांद्रे, हरमल व केरी-तेरेखोल या महत्त्वाच्या समुद्रकिनारी भागात पार्किंगची समस्या गंभीर आहे. सरकारला याची पूर्ण जाणीव आहे. किनारी भागातील मोक्याची जागा संपादित करून पार्किंग समस्या सोडवण्याची योजना असल्याची माहिती दिली. मोरजीच्या नवनिर्वाचित सरपंचा वैशाली मच्छींद्रनाथ शेटगावकर यांना संपर्क साधला असता त्यांनी, सध्या जागा उपलब्ध नसल्याने पार्किं गची अडचण होते. त्यामुळे किनारी भागात पार्किंग सोयीसाठी सरकारला प्रस्ताव पाठवल्याचे त्यांनी सांगितले. टॅक्सी व्यावसायिक उमेश गडेकर म्हणाले, किनारी भागात पर्यटन हंगामातच पार्किंगची समस्या सतावित असते. किनारी भागात पार्किंगची सोय नाही. त्यामुळे भाडे मिळविण्यासाठी रस्त्याच्या बाजूलाच गाडी उभी करावी लागते. तसेच हॉटेलसमोर राहून प्रतीक्षा करावी लागते. शिवाय तेबंवाडा किनारी भागात पार्किंग थांब्यासाठी दि. ८ फेब्रुवारी रोजी मोरजी ग्रामसभेत ठराव मांडला असल्याचे त्यांनी सांगितले.मोरजी पंचायत सचिव रमेश मांद्रेकर यांच्याकडे संपर्क साधला असता त्यांनी, हा ठराव संबंधित खात्याकडे पाठवला जाईल. मोरजी किनारी भागात मोठ्या प्रमाणात पर्यटन हंगामात पार्किंग समस्येचा विषय ऐरणीवर येत असतो. पार्किंग जागा नसल्याने पर्यटक व स्थानिक वाहने मिळलेल्या ठिकाणी पार्क करतात. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते.मोरजीत टॅक्सी थांब्यासाठी व्यावसायिकांनी अनेकवेळा मागणी केली; परंतु त्याची पूर्तता झाली नाही. पर्यटन खात्याला पर्यटन हंगामातून करोडो रुपये महसूल मिळतो. मात्र, पर्यटकांच्या सोयीसुविधांकडे शासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. पार्किंगची व्यवस्था नसल्याने पर्यटक वाहने घेऊन किनार्यांवर येत नाहीत. (प्रतिनिधी)