शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

संसदेत कायदे बनविण्याच्या प्रक्रियेत चर्चेचा अभाव, सरन्यायाधीश एन.व्ही. रमणा यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2021 06:03 IST

Chief Justice of India N.V. Ramana : ते म्हणाले की, संसदेमध्ये होणाऱ्या नव्या कायद्यांमध्ये संदिग्धता असते. हे कायदे करण्याचा हेतू न्यायालयाला माहीत नसतो. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर संसदेत अतिशय अभ्यासू चर्चा होत असत.

नवी दिल्ली : संसदेमध्ये कायदे बनविण्याच्या प्रक्रियेमध्ये अभ्यासपूर्ण चर्चेचा अभाव आहे, अशी टीका सरन्यायाधीश एन.व्ही. रमणा यांनी केली आहे. स्वातंत्र्यदिनी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण केल्यानंतर सरन्यायाधीशांनी आपल्या भाषणात हे वक्तव्य केले.ते म्हणाले की, संसदेमध्ये होणाऱ्या नव्या कायद्यांमध्ये संदिग्धता असते. हे कायदे करण्याचा हेतू न्यायालयाला माहीत नसतो. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर संसदेत अतिशय अभ्यासू चर्चा होत असत. त्या काळात संसदेच्या दोन्ही सभागृहांत विधायक हेतूने व विवेक राखून चर्चा केली जात असे.त्यांनी सांगितले की, सध्या संसदेमध्ये अभ्यासपूर्ण चर्चेअभावी कायदे बनतात. कायदे बनविताना पुरेशी चर्चा झालेली नसल्याने हे नवीन कायदे बनविण्यामागचे हेतू न्यायालयाला कळू शकत नाहीत. सरन्यायाधीश एन.व्ही. रमणा म्हणाले की, स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या काळात अनेक वकील संसदेत खासदार म्हणून निवडून आले आहेत. त्या वकिलांमुळेच कदाचित संसदेत तेव्हा अभ्यासपूर्ण चर्चा झाली असावी. वकील समुदायाने पुन्हा एकदा सार्वजनिक जीवनातमोठे योगदान दिले पाहिजे वसंसदेतील चर्चांमध्ये चांगला बदल घडवून आणायला हवा. संसदेत अभ्यासपूर्ण चर्चा होत नसल्यामुळे त्या कायद्यांविरोधात न्यायालयात अनेक याचिका दाखल होणे हे चांगले चित्र नाही. त्यामुळे संसदेत कायदे करताना उत्तम चर्चा होणे अत्यंत आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयIndependence Dayस्वातंत्र्य दिनN V Ramanaएन. व्ही. रमणा