शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

चीनच्या हालचालींचा सॅटेलाइट पुरावा; LACजवळ तैनात केले १००० सैनिक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2020 09:36 IST

24 मे रोजी झालेल्या फोटोंच्या विश्लेषणामध्ये आयटीबीपीच्या छावणीपासून सुमारे 3 किलोमीटर अंतरावर छोट्या बोटी वापरुन चिनी सैन्यांची संभाव्य हालचाल दिसून येते.

ठळक मुद्देयुरोपियन स्पेस एजन्सीने टिपलेल्या सॅटेलाइट फोटोंमध्ये लडाखमधील पांगोंग लेकजवळ आयटीबीपी कॅम्पसमोर चिनी सैन्य तैनात असल्याचे दिसून येते.

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून सीमेवर चीनच्या कुरापती वाढल्या आहेत. खबरदारीचा उपाय भारताने देखील या भागातील आपले लष्करी बळ वाढविले आहे. लडाख सीमेवर दोन्ही देशांचे सैनिक आमने-सामने आले आहेत. यातच दोन्ही सैन्यांमध्ये चर्चेद्वारे कोणताही तोडगा निघाला नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, अशा परिस्थितीत भारतीय लष्कर नियंत्रण रेषेजवळ (एलएसी) प्रदीर्घ तणावासाठी सज्ज आहे. दोन्ही देशांनी या भागात अतिरिक्त फौजफाटा तैनात केला आहे. दोन्ही देशांकडून एक-एक हजाराहून अधिक सैनिक अतिशय कमी अंतरावर तैनात आहेत.

युरोपियन स्पेस एजन्सीने टिपलेल्या सॅटेलाइट फोटोंमध्ये लडाखमधील पांगोंग लेकजवळ आयटीबीपी कॅम्पसमोर चिनी सैन्य तैनात असल्याचे दिसून येते. गेल्या एका महिन्यातील फोटोंशी तुलना केली असता, या कालावधीत एलएसीच्या दुसऱ्या बाजूला चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) च्या हालचाली उघडकीस आल्या आहेत. 24 मे रोजी झालेल्या फोटोंच्या विश्लेषणामध्ये आयटीबीपीच्या छावणीपासून सुमारे 3 किलोमीटर अंतरावर छोट्या बोटी वापरुन चिनी सैन्यांची संभाव्य हालचाल दिसून येते.

फोटोंच्या ऐतिहासिक विश्लेषणावरून असे दिसून येते की, सीमेच्या या बाजूला भारताच्या भागात आयटीबीपीचे  अनेक वर्षांपासून कायमस्वरूपी कॅम्प आहे. हे फोटो एलएसीपासून सुमारे 2.5 किमी अंतरावर चीनचे सैनिक तैनात असल्याचे दर्शवितात. मे 2020 च्या पहिल्या आठवड्यात घेतलेल्या फोटोंमध्ये चीनचे सैनिक तैनात असल्याचे दिसत नाही.

4 मे आणि 24 मे 2020 मधील फोटोंची तुलना (सोर्स: युरोपियन स्पेस एजन्सी)

एलएसीच्या भारताच्या बाजूने फोटोंमध्ये आयटीबीपीकडून अतिरिक्त जवान तैनात असल्याचे दिसते.

2020 एप्रिल ते मे दरम्यान आयटीबीपी कॅम्प. एलएसीच्या दुसऱ्या बाजूला तलावाच्या छोट्या बोटीतून होणार्‍या हालचालींचे फोटो देखील दर्शवितात. (सोर्स: युरोपियन स्पेस एजन्सी)

24 एप्रिल आणि 24 मे च्या एलएसी येथे तलावाच्या दोन्ही बाजूंच्या फोटोंची तुलना (सोर्स: युरोपियन स्पेस एजन्सी)

या फोटोंमध्ये स्पष्ट होते की, 5 मे रोजी झालेल्या चकमकीनंतर चीनने अतिरिक्त फौजफाटा तैनात केला आहे.

फोटोंनुसार दिसते की, तलावाचे संपूर्ण क्षेत्र आणि एलएसीच्या दोन्ही बाजूला सैन्य (सोर्स: युरोपियन स्पेस एजन्सी) 

टॅग्स :chinaचीनIndiaभारतIndian Armyभारतीय जवान