शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

"मुलीला शिकवलंस तर सुशिक्षित नवरा कुठून आणणार?", लोकांचे टोमणे; मजुराची लेक झाली अधिकारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2024 18:11 IST

सीमाची गोष्ट समाजातील अशा लोकांसाठी प्रेरणादायी आहे ज्यांना आर्थिक अडचणींमुळे आपली स्वप्नं सोडावी लागतात.

बिहारमधील समस्तीपूर जिल्ह्यातील सीमा कुमारी हिने माणसामध्ये खरी जिद्द आणि संघर्ष करून कोणत्याही अडथळ्यावर मात करण्याची इच्छा असेल तर अशक्य वाटणाऱ्या गोष्टी या सहज शक्य होतात हे सिद्ध केलं आहे. गवंडी म्हणून काम करणाऱ्या वडिलांसोबत गरिबीशी लढा देत सीमाने तिची स्वप्नं साकार केली आणि ती तिच्या गावातील पहिली पोलीस अधिकारी बनली.

सीमाची गोष्ट समाजातील अशा लोकांसाठी प्रेरणादायी आहे ज्यांना आर्थिक अडचणींमुळे आपली स्वप्नं सोडावी लागतात. वडिलांनी २०० रुपये प्रतिदिन मजुरी करून मुलीला शिक्षण दिलं आहे. मुलीला शिकवत असताना गावातील लोक त्यांना टोमणे मारायचे. मुलीला शिकवलंस तर जास्त शिकलेला, सुशिक्षित नवरा कुठून आणणार? असं लोक म्हणायचे. पण शिक्षण आणि वडिलांनी दाखवलेल्या विश्वासामुळेच सीमा पोलीस अधिकारी झाली आहे. 

सीमाचा आतापर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. २०२१ मध्ये त्यांनी बिहार पोलिसात हवालदार म्हणून काम केलं, परंतु तिचं उद्दिष्ट यापेक्षा खूप मोठं होतं. ड्युटी संपल्यावर रात्रभर अभ्यास करायची आणि दिवसभर काम करताना सोबत पुस्तकं असायची. तिला सुरुवातीला अपयश आलं पण ती हिंमत हारली नाही. संघर्ष आणि मेहनतीच्या बळावर तिने अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण केलं.

सीमाच्या वडिलांनी दिला खूप मदत केली. गवंडी म्हणून काम करत असताना त्यांनी आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. लोकांनी त्यांना टोमणे मारले तरी त्यांनी हार मानली नाही. सीमाचं शिक्षण हे त्यांच्यासाठी महत्त्वाचं होतं. आता सीमा अधिकारी झाल्यावर वडिलांनी अभिमानाने माझं स्वप्न पूर्ण झालं असं म्हटलं आहे. 

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टीPoliceपोलिस