शहरं
Join us  
Trending Stories
1
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
2
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
3
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
4
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
5
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांचा 'चतुर' मारा; ऋतुराज गायकवाड एकटा भिडला अन् विराटला... 
6
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
7
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
8
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
9
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
10
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
11
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
12
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
13
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
14
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
15
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
16
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
17
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
18
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
19
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
20
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार

हा खरा 'हिरा'; 250 रुपयांची मदत केलेल्या मित्राला देणार दीड कोटीच्या हिऱ्यातील वाटा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2018 12:31 PM

मध्य प्रदेशमधील हिऱ्यांच्या खाणीसाठी प्रसिद्ध असलेल्या पन्ना जिल्ह्यामध्ये एका मजुराचं नशीब एका रात्रीत फळफळलं आहे.

भोपाळ - मध्य प्रदेशमधील हिऱ्यांच्या खाणीसाठी प्रसिद्ध असलेल्या पन्ना जिल्ह्यामध्ये एका मजुराचं नशीब एका रात्रीत फळफळलं आहे. जमिनीत खोदकाम करत असताना मजुराला 42.59 कॅरेटचा एक मौल्यवान हिरा सापडला आहे. मोतीलाल प्रजापती असं हिरा सापडलेल्या मजुराचं नाव असून खाणीत सापडलेला हा सगळ्यात जास्त वजनाचा दुसऱ्या क्रमांकाचा हिरा आहे. मोतीलालला सापडलेल्या हिऱ्याचा जानेवारी महिन्यात लिलाव केला जाणार आहे. लिलावानंतर मिळणाऱ्या पैशातील काही रक्कम मोतीलाल त्याच्या एका मित्राला देणार आहे. 

कृष्णा-कल्याणपूर गावाजवळील एका खाणीत मोतीलाल आणि त्याच्या चार सहकाऱ्यांनी  खोदण्याचं काम सुरु केलं होतं. त्याचदरम्यान त्यांना एक मौल्यवान हिरा सापडला. मोतीलाल आणि त्याच्या सहकाऱ्यांनी तो हिरा कार्यालयात नेऊन जमा केला आहे. याआधी 1961 मध्ये  44.55 कॅरेटचा सर्वात मोठा आणि मौल्यवान हिरा सापडला होता. त्यानंतर आता मोतीलालला तब्बल दीड कोटी रुपयांचा हिरा मिळाला आहे. 

मोतीलालला सापडलेल्या हिऱ्याचा जानेवारी महिन्यात लिलाव केला जाईल. यातून मिळणाऱ्या रक्कमेतून सरकार कर कापून घेईल आणि उरलेली रक्कम मोतीलालला देण्यात येणार आहे. मोतीलाल या रक्केमतील काही हिस्सा हा त्याला 250 रुपयांची मदत केलेल्या एका मित्राला देणार आहे. रघुवीर प्रजापती असं त्याच्या मित्राचं नाव आहे. मित्र अत्यंत गरीब असून त्याला पैशाची गरज असल्याने मोतीलालने हा निर्णय घेतल्याचं म्हटलं आहे. तसेच माझ्या कुटुंबियांसाठी हा आनंदाचा क्षण असल्याचं मोतीलालने म्हटलं आहे. जी रक्कम मिळेल ती रक्कम कुटुंबाच्या भल्यासाठी आणि मुलांच्या शिक्षणासाठी वापरणार असल्याचंही त्याने सांगितलं. तसेच लिलावानंतर मिळणारे पैसे सर्व सहकाऱ्यांमध्ये वाटून घेतले जातील असंही मोतीलाल यांनी म्हटलं आहे.  

 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेश