पुलावरून उडी मारून मजुराची आत्महत्त्या

By Admin | Updated: May 27, 2014 00:10 IST2014-05-26T23:55:10+5:302014-05-27T00:10:59+5:30

पंचवटी : चोपडा लॉन्सजवळील पुलावरून गोदावरी नदीपात्रात उडी मारून एका मजुराने आत्महत्त्या केल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली़ पंचवटी अग्निशमन दलाच्या कर्मचार्‍यांनी अर्ध्या तासाच्या अथक प्रयत्नांनंतर मृतदेह बाहेर काढला़ आत्महत्त्येचे कारण समजू शकले नसून, या घटनेची पंचवटी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़

The laborer's suicide by jumping from the bridge | पुलावरून उडी मारून मजुराची आत्महत्त्या

पुलावरून उडी मारून मजुराची आत्महत्त्या

पंचवटी : चोपडा लॉन्सजवळील पुलावरून गोदावरी नदीपात्रात उडी मारून एका मजुराने आत्महत्त्या केल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली़ पंचवटी अग्निशमन दलाच्या कर्मचार्‍यांनी अर्ध्या तासाच्या अथक प्रयत्नांनंतर मृतदेह बाहेर काढला़ आत्महत्त्येचे कारण समजू शकले नसून, या घटनेची पंचवटी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़
याबाबत अधिक माहिती अशी की, इगतपुरी तालुक्यातील सांजेगाव येथील रहिवासी सुभाष हिरामण बोके (३५) हे गेल्या काही दिवसांपासून अंबड येथे मजुरी काम करीत होते़ सोमवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास चोपडा लॉन्स येथील पुलावरून त्यांनी गोदावरी नदीपात्रात उडी मारली़ या घटनेची माहिती पंचवटी पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी मानकर यांनी पंचवटी अग्निशमन विभागाला दिली़ यानंतर तातडीने पथक घटनास्थळावर पोहोचले व मृतदेह बाहेर काढला़ सुभाष बोके यांचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी पंचवटी अग्निशमन विभागाचे केंद्रप्रमुख पी़ व्ही़ तिडके, लिडिंग फ ायरमन ए़ एच़ पोरजे, के.बी़ हिंगमिरे, सब ऑफि सर जे़ एस़ अहिरे, वाहनचालक आऱ एस़ बैरागी, फ ायरमन एम़ पी़ म्हस्के, आऱ आऱ खारे, एस़ बी़ जाधव, यू़ आऱ झिटे़ एस़ पी़ शिलावट, बी़ पी़ पाटील आणि कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले़(वार्ताहर)

Web Title: The laborer's suicide by jumping from the bridge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.