शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

मजुराचे उजळले नशीब! खाणीत 30 लाखांहून अधिक किमतीचा सापडला हिरा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2022 15:13 IST

Madhya Pradesh  : 3 महिन्यांच्या अथक परिश्रमानंतर मजुराला जेम्स क्वालिटीचा मोठा हिरा मिळाला असून त्याची किंमत लाखो रुपये आहे. दरम्यान, पन्ना हे हिऱ्यांचे शहर म्हणूनही ओळखले जाते.

पन्नाच्या (Panna) रत्‍नगर्भाची धरती कुणाला राजा बनवू शकेल, हे सांगता येत नाही. पन्नाच्या रत्नगर्भाने एका मजुराचे नशीब हिऱ्यासारखे उजळले आहे. मजूर आता रातोरात करोडपती झाला आहे. 3 महिन्यांच्या अथक परिश्रमानंतर मजुराला जेम्स क्वालिटीचा मोठा हिरा मिळाला असून त्याची किंमत लाखो रुपये आहे. दरम्यान, पन्ना हे हिऱ्यांचे शहर म्हणूनही ओळखले जाते.

येथील धरतीने अनेक लोकांना रातोरात राजा बनवले आहे. असाच प्रकार कुआं येथील रहिवाशी प्रताप सिंह यादव (Pratap Singh Yadav) यांच्यासोबत घडला आहे. गरिबीने त्रस्त असलेल्या प्रताप सिंह यादव यांनी फेब्रुवारी महिन्यात शासकीय हिरे कार्यालयात अर्ज घेऊन 10 बाय 10 आकाराची हिऱ्याची खाण खोदण्यासाठी भाडेतत्त्वावर मंजुरी दिली घेतली होती. त्यांनी खाणीत रात्रंदिवस काम केले आणि आता त्यांचे नशीब बदलले आहे.

गरीब मजूर प्रताप सिंह यादव आज करोडपती झाला असून त्यांना खाणीतून हिरा मिळाला आहे. या हिऱ्याचे वजन 11.88 कॅरेट असून त्याची अंदाजे किंमत 30 लाखांहून अधिक असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, प्रताप सिंह यादव यांनी हिरा कार्यालयात जमा केला आहे. हिऱ्यांच्या लिलावानंतर मिळालेल्या पैशातून आता आपली आर्थिक स्थिती सुधारेल आणि हे पैसे आपल्या मुलांच्या देखभाल आणि शिक्षणासाठी खर्च करता येतील, असे प्रताप सिंह यादव यांचे म्हणणे आहे. 

'हिरा मिळालेल्या व्यक्तीला दिली जाईल रक्कम'हे जेम्स क्वालिटीचे रत्न असून ते उच्च दर्जाचे मानले जाते आणि त्याची अंदाजे किंमतही खूप जास्त आहे. आता तो आगामी हिऱ्यांच्या लिलावात ठेवण्यात येणार असून त्याचा लिलाव होणार आहे. लिलावानंतर 12 टक्के रॉयल्टी कापून उर्वरित रक्कम हिरा मिळालेल्या व्यक्तीला दिली जाईल, असे हिरा अधिकारी रवी पटेल यांनी सांगितले. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशJara hatkeजरा हटके