कामगार कल्याण मंडळ

By Admin | Updated: July 8, 2015 23:45 IST2015-07-08T23:45:05+5:302015-07-08T23:45:05+5:30

कामगार कल्याण मंडळाचा

Labor Welfare Board | कामगार कल्याण मंडळ

कामगार कल्याण मंडळ

मगार कल्याण मंडळाचा
वर्धापनदिन साजरा
नागपूर : स्नेहमीलन, आदरातिथ्य आणि सुगम संगीताच्या कार्यक्रमाने महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचा ६२ वा वर्धापनदिन रघुजीनगर येथील कामगार कल्याण भवन येथे मोठ्या थाटात पार पडला.
माजी कामगार राज्यमंत्री हरिभाऊ नाईक, आ. सुधाकर कोहळे, माजी. आ. दीनानाथ पडोळे, नगरसेवक सतीश होले, मुन्ना यादव, नगरसेविका मनीषा कोठे, जयश्री वाडीभस्मे, कामगार कल्याण मंडळाचे सदस्य प्रमोद मोहोड, बालरोग तज्ज्ञ उदय बोधनकर, प्रसिद्ध गायक एम. ए. कादर, मोहम्मद हाफीज, सुनील वाघमारे याप्रसंगी उपस्थित होते. त्यांचा मंडळाचे माजी सदस्य ॲड. मधुकर कोलते यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सहायक कल्याण आयुक्त सतीश दाभाडे यांनीही विविध क्षेत्रातील अग्रणी विजय शिंदे, प्रदीप खानोरकर, अरुण डांगरे, जगदीश पाटमासे, मनोहर अडकिणे, रामदास सेलोकर, अभय अंजीकर, गौरव अळणे, गुलाम करीम, पुरुषोत्तम मानकर, रवींद्र खडसे, बळवंत भोयर, सतीश नखाते, वसंत पाटील, दिनेश ठाकरे, ज्ञानेश्वर रक्षक, जैमिनी कडू, प्रल्हाद गावंडे, ओमप्रकाश पाठराबे, डॉ. हरीश धुरट, पंढरीनाथ सालेगुंजेवार, सलीम शेख, रोशन नंदवंशी, रमेश बिसीकर, किशोर डाऊ, रूपाली कोंडेवार, संभाजी भोसले, अनिल लोणारे, हरीश देशमुख, शरद पाटील, संजय नखाते, मनीष कोरे, मुन्ना महाजन, मायाताई हाडे, अरविंद देशमुख, श्याम देशमुख आदींचे स्वागत केले. केंद्र संचालक सुधर्मा खोडे यांनी कार्यक्रमाचे संचालन तर कामगार कल्याण अधिकारी अरुण कापसे यांनी आभार मानले.

Web Title: Labor Welfare Board