शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

'मतभेदांना देशविरोधी ठरवणं हा लोकशाहीवरील हल्ला'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2020 08:41 IST

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांचं प्रतिपादन

अहमदाबाद: सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी विरोधात सध्या देशातल्या अनेक भागांमध्ये आंदोलनं सुरू आहेत. शांततेच्या मार्गानं सुरू असलेल्या या आंदोलनांवर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांनी महत्त्वपूर्ण भाष्य केलं आहे. मतभेदांना देशविरोधी आणि लोकशाहीविरोधी ठरवणं हा लोकशाहीवरील हल्ला असल्याचं मत चंद्रचूड यांनी व्यक्त केलं. विचारांना दाबून टाकणं म्हणजे देशाचा आत्माच दाबून टाकण्यासारखं असल्याचं ते पुढे म्हणाले. गुजरात उच्च न्यायालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या १५ व्या पी. डी. स्मृती व्याख्यानमालेत ते बोलत होते. लोकशाहीत मतभेद सेफ्टी व्हॉल्वसारखे असतात. त्यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी सरकारी यंत्रणांचा वापर झाल्यास भीतीची भावना निर्माण होते. मतभेदांना देशविरोधी आणि लोकशाहीविरोधी ठरवणं हा देशाच्या आत्म्यावरील हल्ला असल्याचं प्रतिपादन त्यांनी केलं. मतभेदांना संरक्षण देणं गरजेचं असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. प्रश्न विचारण्याची शक्यताच संपुष्टात आणणं, मतभेद संपवण्याचा प्रयत्न करणं यामुळे आपला आर्थिक, सांस्कृतिक आणि सामाजिक पायाच नष्ट होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. मतभेदांवर हल्ला करण्याचा अर्थ लोकशाही मानणाऱ्या समाजाच्या गाभ्यावर आघात असा होतो. त्यामुळेच कोणत्याही सरकारनं अभिव्यक्ती स्वातंत्र्य जपायला हवं. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होणार नाही, याची काळजी सरकार आणि सरकारच्या यंत्रणेनं घ्यायला हवी. मतभेद व्यक्त करण्यास बाधा निर्माण करण्याचे प्रयत्न सरकारनं रोखायला हवेत, असं न्यायमूर्ती चंद्रचूड म्हणाले. 

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकNational Register of CitizensएनआरसीSupreme Courtसर्वोच्च न्यायालय