शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

'La(Mo) + Ni(Mo) -----> Bha(Go); घोटाळे करुन पळून जायचा Na(Mo) फॉर्म्युला'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2018 17:08 IST

हजारो कोटींचा घोटाळा करून ललित मोदी आणि नीरव मोदी देशातून सहीसलामत पळून गेले.

नवी दिल्ली: पंजाब नॅशनल बँकेत झालेल्या घोटाळ्यावरून काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये एक मजेशीर फॉर्म्युला दिला आहे. Na(Mo) La(Mo) + Ni(Mo) -----> Bha(Go), हा फॉर्म्युला वापरा आणि देशातून पळून जा, असे राहुल यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. या सांकेतिक फॉर्म्युलामध्ये ललित मोदी आणि नीरव मोदी यांचा उल्लेख केला आहे. यापैकी ललित मोदी यांच्यावर आयपीएलमधील गैरव्यवहारांच्या माध्यमातून बेहिशेबी संपत्ती गोळा केल्याचा आरोप आहे. तर नीरव मोदी हे पंजाब नॅशनल बँकेतील नुकत्याच उघडकीस झालेल्या महाघोटाळ्यामुळे चर्चेत आले आहेत. हजारो कोटींचा घोटाळा करून ललित मोदी आणि नीरव मोदी देशातून सहीसलामत पळून गेले. त्यामुळे घोटाळेबाजांना देशातून पळून जाण्याचा नवा फॉर्म्युला मिळाला आहे, असे राहुल यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. राहुल यांनी कालच PNB Scam च्या मुद्द्यावरून मोदींना लक्ष्य केले होते. नरेंद्र मोदींना मिठी मारा, १२ हजार कोटी रुपये लुटा हेच नीरव मोदीचे सूत्र होते, अशी बोचरी टीका राहुल यांनी केली होती.

पंजाब नॅशनल बँकेच्या मुंबईतील ब्रीच कँडी शाखेत घोटाळा झाल्याचे बुधवारी उघड झाले होते.  हिरे व्यापारी नीरव मोदीने आपल्या मित्रांच्या सहाय्यानं पंजाब नॅशनल बँकेला हा गंडा घातल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर आज शेअर बाजारात बँकेचे शेअर जोरदार कोसळले. त्यामुळे पीएनबीने मुंबई शेअर बाजाराला पत्र लिहिलं. घोटाळ्यानंतर खडबडून जाग्या झालेल्या सक्तवसुली संचलनालयाने याप्रकरणी घोटाळ्याचा सूत्रधार आणि प्रतिष्ठित हिरे व्यावसायिक नीरव मोदी याच्या कार्यालयांवर छापेमारी सुरु झाली आहे. नीरव मोदी याच्या मुंबईसहीत तीन शहरांमधील शोरुम आणि कार्यालयांवर छापेमारी झाली आहे. या छाप्यांतून डीनं हिरे, ज्वेलरी, मौल्यवान खडे आणि सोनं असे 5 हजार 100 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीPunjab National Bank Scamपंजाब नॅशनल बँक घोटाळा