शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

फास्टॅगबाबत रस्ते वाहतूक मंत्रालयाने दिले नवे आदेश, या बाबीची पूर्तता न झाल्यास होणार दंड 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2024 21:19 IST

Fastag KYC: भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने एक वाहन एक फास्टॅग योजनेची सुरुवात केली आहे. या योजनेचा उद्देश अनेक वाहनांसाठी एकाच फास्टॅगचा वापर किंवाएका विशेष वाहनासाठी अनेक फास्टॅग जोडण्यापासून रोखणे हा आहे.  

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने एक वाहन  एक फास्टॅग योजनेची सुरुवात केली आहे. या योजनेचा उद्देश अनेक वाहनांसाठी एकाच फास्टॅगचा वापर किंवाएका विशेष वाहनासाठी अनेक फास्टॅग जोडण्यापासून रोखणे हा आहे.  फास्टॅगची निश्चित कालमर्यादेत केवायसी करणे अनिवार्य करण्यात आलं आहे. तसेच थकित रकमेसह अपूर्ण केवायसी असलेल्या फास्टॅगला ३१ जानेवारी २०२४ नंतर निष्क्रिय किंवा ब्लॅकलिस्ट करण्यात येणार आहे. तसेत टोलवर पोहोचल्यावर तुम्हाला दंडही भरावा लागू शकतो. 

रस्ते वाहतूक मंत्रालयामधील पीआरबीच्या एडीजी जे.पी. मट्टू सिंह यांनी सांगितले की, केवायसी करण्यामध्ये जुन्या फास्टॅगचा समावेश असेल. कारण गेल्या काही वर्षांत घेतलेले फास्टॅग हे आधार कार्डशी लिंक आहेत. तसेच त्यांची केवायसीही झालेली आहे. ब्लॅकलिस्ट करण्यात आलेल्या जुन्या फास्टॅगमध्ये अशा प्रकारची समस्या येत आहे.  अशा फास्टॅगधारकांना आपलं खातं असलेल्या बँकेत जाऊन केवायसी अपडेट करावी लागेल. म्हणजेच कुणी पेटीएमवरून फास्टॅग घेतला असेल तर पेटीएममध्ये जाऊन अपडेट करावं लागेल. तर कुणी बँकेतून घेतलं असेल तर त्याला बँकेत जाऊन फास्टॅग अपडेट करावं लागेल.

याबाबत माहिती देताना वाहतूक तज्ज्ञ अनिल छिकारा यांनी सांगितले की, काही वाहनचालक याचा गैरवापर करत आहेत. लहान गाडीचा फास्टॅग वापरून मोठं व्यावसायिक वाहन चालवत आहेत. उदाहरण द्यायचं तर छोट्या गाटीचा टोल १०० रुपये असतो. तर व्यावसायिक गाडीचा टोल हा ५०० रुपये असतो. फास्टॅगमध्ये छोट्या गाडीचा नंबर नोंदवलेला असतो. अशा परिस्थितीत कार्ड रीडर व्यावसायिक वाहनाची नोंद छोटी गाडी म्हणून घेतो आणि १०० रुपयेच टोल कापला जातो. अशा प्रकारे वाहनचालकांकडून महसुलाचं नुकसान होतं.

फास्टॅगच्या वापरकर्त्यांना एक वाहन एक फास्टॅगचा वापर करावा लागेल. तसेच आपल्या संबंधिक बँकेच्या माध्यमातून आधी जारी करण्यात आलेले सर्व फास्टॅग सोडावे लागतील. केवळ नवीन फास्टॅग खाती सक्रिय राहतील कारण मागचे टॅग ३१ जानेवारी २०२४ नंतर निष्क्रिय होतील किंवा ब्लॅकलिस्ट केले जातील.  

टॅग्स :Fastagफास्टॅगTrafficवाहतूक कोंडीroad transportरस्ते वाहतूक