कुडतरी जिमखान्याला जेतेपद
By Admin | Updated: July 13, 2015 01:06 IST2015-07-13T01:06:35+5:302015-07-13T01:06:35+5:30
स्ट्रायकर्स फुटबॉल चषक : अंतिम सामन्यात नावेलीचा पराभव

कुडतरी जिमखान्याला जेतेपद
स ट्रायकर्स फुटबॉल चषक : अंतिम सामन्यात नावेलीचा पराभव मडगाव : अंतिम सामन्यात नावेली स्पोर्टिंग क्लबचा २-० गोलने पराभव करीत कुडतरी जिमखाना संघाने स्ट्रायकर्स फुटबॉल चषक पटकावला. विजेत्या कुडतरी जिमखाना संघाला रोख ४० हजार रुपये व चषक तर पराभूत नावेलीच्या संघाला रोख ३० हजार व चषक प्रदान करण्यात आला. ही स्पर्धा यंग स्ट्रायकर्स ऑफ बाणावली तर्फे बाणावली येथील दांडो मैदानावर खेळविण्यात आली. सामन्यात, २० व्या मिनिटाला माकूर्ूस फर्नाडीसने दिलेल्या पासवर मारीयो मास्कारेन्हसने हेडरवर पहिल्या गोल नोंदवण्यात आला. या गोलच्या आधारावर कुडतरी संघाने मध्यंतरापर्यंत आघाडी कायम राखली. त्यानंतर दुसर्या सत्रातही कुडतरी संघाचेच वर्चस्व दिसून आले. मेल्विन फर्नांडिसने ६५ व्या मिनिटाला दुसरा गोल नोंदवला. यावेळी त्याला मारियो फर्नाडीसने पास दिला होता.तर अखेरच्या क्षणापर्यंत नावेलीच्या संघाने गोलांची परतफेड करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र प्रतिस्पर्धी संघाला यश आले नाही. स्पर्धेच्या बक्षिस वितरण सभारंभास माजी आमदार चर्चिल आलेंमाव, जिल्हा पंचायत सदस्या मारिया रिबेलो, गोवा फुटबॉल संघटनेचे दक्षिण गोवा उपाध्यक्ष शुबर्ट फुर्तादो, अध्यक्ष ॲल्विस गोम्स, जीएफए सदस्य अँथनी पांगो, अँथनी एल. डिसील्वा, आर्नाल्ड क ोस्ता, बिश्ूाट तिमोदो उपस्थित होते. वैयक्तिक कामगिरी अशी : उत्कृष्ट बचाव खेळाडू नॅविन परेरा- नावेली स्पोर्टिंग , आघाडीपटू स्टिफन फर्नाडीस -कुडतरी जिमखाना, गोलरक्षक क्लेटॉन गोम्स - नावेली स्पोर्टिंग , मध्य खेळाडू नेल्सन गोम्स -सेंट अँथनी क ोलवा, ाा पहिला गोल मारीयो मास्कारेन्हस- कुडतरी जिमखाना, स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू रोवन परेरा- नावेली. ढँङ्म३ङ्म : 1207-टअफ-09कॅप्शन: यंग स्ट्रायकर्स फुटबॉल स्पर्धेचा चषक चर्चिल आलेंमाव यांच्याकडून स्विकारताना कुडतरी जिमखाना संघाचा कर्णधार बाजूला इतर. छाया- अरविंद टेंगसे