कुशावर्ताच्या जलाने सिंहस्थाचे ध्वजारोहण गौरीघुमट परिसरात शंखध्वनी : कुंभमेळ्यासाठी जाणार्‍यांची सोय

By Admin | Updated: July 15, 2015 00:15 IST2015-07-15T00:15:00+5:302015-07-15T00:15:00+5:30

अहमदनगर : त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्ताच्या पवित्र जलाने पूजा करून सिंहस्थ कुंभमेळ्याचे नगर येथील गौरीघुमट भागात ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी शंखनिनाद करण्यात आला. कुंभमेळ्याच्या शाही व पवित्र स्नानाचा नगरच्या भाविकांना लाभ घेता यावा यासाठी सिंहस्थ कुंभमेळा सहयोगी समितीने पुढाकार घेतला आहे.

Kushwarta Jaldi flag hoisting of Simhastha, Gouri Gummat area, Shankhvanwani: Convenience for Kumbh Mela | कुशावर्ताच्या जलाने सिंहस्थाचे ध्वजारोहण गौरीघुमट परिसरात शंखध्वनी : कुंभमेळ्यासाठी जाणार्‍यांची सोय

कुशावर्ताच्या जलाने सिंहस्थाचे ध्वजारोहण गौरीघुमट परिसरात शंखध्वनी : कुंभमेळ्यासाठी जाणार्‍यांची सोय

मदनगर : त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्ताच्या पवित्र जलाने पूजा करून सिंहस्थ कुंभमेळ्याचे नगर येथील गौरीघुमट भागात ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी शंखनिनाद करण्यात आला. कुंभमेळ्याच्या शाही व पवित्र स्नानाचा नगरच्या भाविकांना लाभ घेता यावा यासाठी सिंहस्थ कुंभमेळा सहयोगी समितीने पुढाकार घेतला आहे.
नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे जुलै-ऑगस्ट महिन्यात सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. या मेळ्याचे ध्वजारोहण मंगळवारी सकाळी त्र्यंबकेश्वरला पार पडले. या पार्श्वभूमीवर नगरच्या कुंभमेळा सहयोग समितीनेही ध्वजारोहण केले. त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तीनाथांच्या दिंडीचे प्रमुख मोहन बेलापूरकर महाराज यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी विश्वनाथ महाराज राऊत, निवृत्तीनाथांच्या दिंडीचे प्रमुख बाळकृष्ण महाराज, श्रीपंचायत बडा उदासीन निर्वाण आखाड्याचे प्रचार प्रमुख नामदेवशास्त्री महाराज, माजी नगराध्यक्ष शंकरराव घुले, संयोजन समितीचे प्रमुख वसंत लोढा आदी उपस्थित होते.
यावेळी बेलापूरकर महाराज म्हणाले, बारा वर्षांनी होणार्‍या सिंहस्थ कुंभमेळ्याला देशातून लाखो भाविक येतात. मात्र गर्दी व गैरसोयीमुळे भाविकांचे हाल होतात. त्यामुळे अनेक भाविक कुंभमेळ्यास जात नाहीत. या पार्श्वभूमीवर कुंभमेळ्यास जाणार्‍या भाविकांची निवास आणि भोजनाची व्यवस्था करून नगरच्या समितीने धार्मिक कार्याला हातभार लावला आहे. जास्तीत जास्त भाविकांनी या मेळ्याचा लाभ घ्यावा.
नामदेवशास्त्री महाराज म्हणाले, श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे १३ आखाड्यांच्या माध्यमातून शाहीस्नानाचे नियोजन केले जाते. श्रीपंचायत बडा उदासीन आखाडा यातील प्रमुख घटक आहे. या आखाड्याने एका पर्वणी काळात पाच हजार भाविकांची सोय केली आहे. नगरमध्ये प्रथमच भाविकांच्या सोयीसाठी विशेष समिती स्थापन झाली. या समितीकडे नगर जिल्ह्यातील भाविकांनी नोंदणी करावी.
वसंत लोढा म्हणाले, श्रीपंचायत बडा उदासीन आखाड्यामुळेच नगरच्या भाविकांची सोय होत आहे. त्र्यंबकेश्वर येथे ध्वजारोहण झाल्यानंतर नगरमध्ये ध्वजारोहण करण्याचा योग चांगला आहे. भाविकांनी गौरीघुमट येथील कार्यालय, केडगाव,सावेडी येथील पंडित दीनदयाळ पतसंस्थेच्या कार्यालयात तसेच भिंगार येथे नोंदणी करावी.
मंगळवारी झालेल्या कार्यक्रमास संजय झिंजे, संपत बोरा, प्रकाश पोखरणा, राजाभाऊ पोतदार, एन.डी. कुलकर्णी, बाळासाहेब भुजबळ, दिगंबर गेंट्याल, कन्हैय्या व्यास, गौतम कराळे, हेमंत जोशी, श्याम वाघस्कर आदी उपस्थित होते. सुहास मुळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर राजकुमार जोशी यांनी आभार मानले.
-----------
फोटो- १४ कुंभमेळा....
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नगर येथील गौरीघुमट भागात ध्वजारोहण करताना मोहन महाराज बेलापूरकर.
--

Web Title: Kushwarta Jaldi flag hoisting of Simhastha, Gouri Gummat area, Shankhvanwani: Convenience for Kumbh Mela

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.