शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

हृदयद्रावक! रुग्णवाहिका न मिळाल्याने हतबल आईने खांद्यावरून आणला लेकाचा मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2022 12:55 IST

रुग्णालयाबाहेर असलेल्या एका हतबल आईला मुलाचा मृतदेह घरी नेण्यासाठी रुग्णवाहिका मिळाली नाही. या घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशच्या कुशीनगरमध्ये एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. रुग्णवाहिका मिळाली नाही म्हणून एका आईवर मुलाचा मृतदेह खांद्यावरून नेण्याची वेळ आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रुग्णालयाबाहेर असलेल्या एका हतबल आईला मुलाचा मृतदेह घरी नेण्यासाठी रुग्णवाहिका मिळाली नाही. या घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. 

कुशीनगरच्या तमकुहीराज येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. तमकुहीराजमध्ये राहणाऱ्या वहाब अन्सारी यांचा पाच वर्षांचा मुलगा हा खेळता खेळता विजेच्या तारेच्या संपर्कात आला आणि त्याला करंट लागला. घरात असलेल्या आईने त्याला तातडीने उपचारासाठी एका सरकारी रुग्णालयात नेलं. पण तेथे उपस्थित असलेल्या डॉक्टरांनी मुलाला मृत घोषित केलं आहे. 

मुलाचा मृत्यू झाल्यानंतर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी आईला त्याचा मृतदेह घरी घेऊन जायला सांगितलं. तेव्हा त्याला उचलून घेत ती रुग्णालयातून बाहेर पडली. मृतदेह घेऊन जाण्यासाठी तिला रुग्णवाहिका मिळाली नाही. त्यानंतर थोड्यावेळाने महिला एका बाईकवरून मृतदेह घेऊन गेली. वेळेत रुग्णवाहिका न मिळाल्याच्या अनेक घटना याआधी समोर आल्या आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेश