शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

इअरफोननं केला घात, गाणी ऐकत गाडी चालवणं 13 निष्पाप मुलांच्या जिवावर बेतलं !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2018 12:33 IST

कुशीनगर अपघातात 13 मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर मानवरहित क्रॉसिंगसंदर्भात अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. गुरुवारी उत्तर प्रदेशमधील कुशीनगर येथे विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या व्हॅनला झालेल्या भीषण अपघातात काही प्रमाणात गाडी चालकाचा हलगर्जीपणा जबाबदार आहे.

लखनऊः कुशीनगर अपघातात 13 मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर मानवरहित क्रॉसिंगसंदर्भात अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. गुरुवारी उत्तर प्रदेशमधील कुशीनगर येथे विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या व्हॅनला झालेल्या भीषण अपघातात काही प्रमाणात गाडी चालकाचा हलगर्जीपणा जबाबदार आहे. रेल्वे क्रॉसिंग दुर्घटना घडली त्यावेळी गेटमन तैनात होता.स्कूल व्हॅन क्रॉसिंग करत असताना समोर येणा-या रेल्वेची सूचना या गेटमननं गाडीचालकाला दिली होती. गेटमन आवाज देत होता. परंतु गाडीचालकानं कानात एअरफोन घातलेले असल्यानं त्याच्यापर्यंत गेटमनचा आवाज पोहोचलाच नाही. गाडीचालकाच्या हा बेजबाबदार कृत्यामुळे आपण 55075 ट्रेनच्या जवळ जातोय याचा अंदाजच आला नाही आणि बघता बघता ट्रेननं स्कूल व्हॅनला धडक दिली. या अपघातात गाडीचालक आणि 13 मुलांचा मृत्यू झाला आहे. तर 7 विद्यार्थी गंभीररीत्या जखमी आहेत.डिव्हाइन पब्लिक स्कूलची टाटा मॅजिक गाडी सकाळी विद्यार्थ्यांना घेऊन शाळेत निघाली होती. ही व्हॅन दुदही रेल्वे फाटकावर आली असतानाच ट्रॅकवरून थावे-बढनी पॅसेंजर येत होती. त्याचवेळी व्हॅनच्या चालकाने ट्रॅक ओलांडण्याचा प्रयत्न केल्याने पॅसेंजरची धडक व्हॅनला बसली. या धडकेने व्हॅनचा चेंदामेंदा झाला. तर व्हॅनमधून प्रवास करणाऱ्या 13 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. तसेच व्हॅन चालकाचाही या अपघातात मृत्यू झाला.

टॅग्स :Accidentअपघात