चिटफंड घोटाळ्यातील आरोपी खासदार कुणाल घोष यांचा आत्महत्येचा प्रयत्न
By Admin | Updated: November 14, 2014 11:27 IST2014-11-14T11:18:02+5:302014-11-14T11:27:22+5:30
शारदा चिटफंड घोटाळ्याप्रकरणी तुरुंगात असलेले खासदार कुणाल घोष यांनी शुक्रवारी पहाटे झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.

चिटफंड घोटाळ्यातील आरोपी खासदार कुणाल घोष यांचा आत्महत्येचा प्रयत्न
ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. १४ - शारदा चिटफंड घोटाळ्याप्रकरणी तुरुंगात असलेले खासदार कुणाल घोष यांनी शुक्रवारी पहाटे झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. घोष यांच्यावर कोलकात्यातील सरकारी रुग्णालयात उपचार सुरु असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.
शारदा चिटफंड घोटाळ्याप्रकरणी खासदार कुणाल घोष यांना अटक झाली असून तृणमूल काँग्रेसनेही घोष यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. घोष यांनी शारदा चिटफंड घोटाळ्यात तृणमूलचे ज्येष्ठ नेतेही सहभागी असल्याचा आरोप केला होता. माझ्यावर पक्षपातीपणे कारवाई केली जात असून तीन दिवसांत सीबीआयने अन्य आरोपींवर कारवाई केली नाही तर आत्महत्या करीन असा इशाराही घोष यांनी न्यायालयासमोर दिला होता. शुक्रवारी पहाटे घोष यांनी झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. सुदैवाने हा प्रकार तुरुंग प्रशासनाच्या निदर्शनास आला व पुढील अनर्थ टळला.