कुणबी समाज निवडणूक

By Admin | Updated: August 27, 2015 23:45 IST2015-08-27T23:45:18+5:302015-08-27T23:45:18+5:30

अखिल कुणबी समाज संस्थेची प्रथमच अविरोध निवडणूक

Kunabi society election | कुणबी समाज निवडणूक

कुणबी समाज निवडणूक

िल कुणबी समाज संस्थेची प्रथमच अविरोध निवडणूक
नागपूर - गेल्या अनेक महिन्यांपासून वादविवादामुळे चर्चेत असलेल्या अखिल कुणबी समाज संस्थेची निवडणूक मंगळवारी पहिल्यांदाच अविरोध पार पडली व नवीन संचालकांची निवड सर्वाच्या सामंजस्याने करण्यात आली़
खैरे कुणबी समाज भवन येथे निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून अविरोध निवडून आलेल्या संचालकामध्ये सर्वसाधारण सभासद गटातून नरेंद्र कडू, मुरलीधर काळे, महादेवराव शिवणकर, सुनील वऱ्हाडे, रामराव आमले, बंडू ठाकरे, सुरेश जिचकार, प्रकाश गेडाम, राजेंद्र काळमेघ, शेखर मेंढे, शरद वानखेडे, यांची निवड करण्यात आली तर महिला सभासद गटातून गीता उचले, सविता काळे, देणगीदार सभासद गटातून राकेश पन्नासे, अनसूया पन्नासे, आजीवन सभासद गटातून अशोक भोयर, लीलाधर डाफ, क्रियाशिल सभासद गटातून एकनाथ हरिभाऊ काळमेघ व अशोक वसंतराव ढवळे यांची अविरोध निवड करण्यात आली़
ही निवडणूक सामंजस्याने, सर्वांच्या सहमतीने व अविरोध करण्यासाठी सर्व पॅनेल व गटांमध्ये मतैक्य निर्माण करण्यासाठी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश भोयर, भगवंतराव रडके, काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे, जिल्हा कॉंग्रेस उपाध्यक्ष जयंतराव दळवी, माजी महापौर पांडुरंग हिवरकर, मनपा माजी स्थायी समिती अध्यक्ष तानाजी वनवे, नगरसेवक प्रशांत धवड, माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रशेखर कोल्हे, जिल्हा परिषद सदस्य देवेंद्र गोडबोले, माजी स्थायी समिती सदस्य जयंत लुटे, म्हाडाचे माजी संचालक राजेंद्र काळमेघ, कॉंग्रेस कमिटीचे सचिव राकेश पन्नासे, माजी जिल्हा परिषद सदस्य पद्माकर कडू, प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे सचिव हुकूमचंद आमधरे, माजी पंचायत समिती सभापती सुदामजी वानखेडे,माजी जिल्हा परिषद सदस्य मेघराज गिऱ्हे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष पांडुरंग मते, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अशोक धोटे यांनी मुकुंदराव पन्नासे व इतर पॅनेलच्या नेत्यांमध्ये मतैक्य घडवून आणले़ या निवडणुकीत एकुण ३२ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते त्यापैकी अर्ज परत घेण्याच्या दिनांकाला १३ उमेदवारांनी अर्ज परत घेत अविरोध निवडीचा मार्ग सुकर केला़
अपूर्ण --

Web Title: Kunabi society election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.