कुणबी समाज निवडणूक
By Admin | Updated: July 10, 2015 23:13 IST2015-07-10T23:13:34+5:302015-07-10T23:13:34+5:30
आज अखिल कुणबी समाज

कुणबी समाज निवडणूक
आ अखिल कुणबी समाजसंस्थेची वादग्रस्त निवडणूकसहा उमेदवारांनी माघार घेऊन घातला बहिष्कारनागपूर : अखिल कुणबी समाज संस्थेची वादग्रस्त निवडणूक उद्या शनिवारी होत असून अचानक शुक्रवारी सहा उमेदवारांनी निवडणूक रिंगणातून माघार घेऊन निवडणुकीवर बहिष्कार घातला आहे. किशोर धांडे, गजानन गोतमारे, संजय मिसाळ, तुषार रडके, घनशाम ठाकरे आणि विमल गोतमारे, अशी या उमेदवारांची नावे आहेत. ही निवडणूक गैरमार्गाने, अवैधरीत्या आणि अखिल कुणबी समाजाच्या हिताच्या विरुद्ध होत असल्याने आपण माघार घेत असल्याचे एक संयुक्त निवेदन या उमेदवारांनी प्रसिद्धीस दिले आहे.सध्याचे स्वयंघोषित अध्यक्ष पुरुषोत्तम शहाणे आणि सचिव अशोक वानखेडे यांनी संस्थेची कोणतीही सर्वसाधारण सभा न घेता १९ पैकी ७ सदस्यांनी २७ मे २०१५ रोजी संस्थेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. ही निवडणूक घेण्यास मनाई हुकूम देण्यात यावा, अशी विनंती करणारा अर्ज संस्थेचे सदस्य राजेंद्र भोयर, गोपाळ मिसाळ तसेच मुकुंद पन्नासे आणि इतरांनी सह धर्मादाय आयुक्त ए. पी. मते यांच्या न्यायालयात केला होता. परंतु प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्याने कोणताही दिलासा देण्यास न्यायालयाने नकार दिला. तब्बल ११ वर्षांपासून या संस्थेची निवडणूक झाली नव्हती. निवडणूक योग्यरीत्या पार पाडली जावी म्हणून तत्कालीन अध्यक्ष मुकुंद पन्नासे आणि सचिव पंकज खाडे यांनी आपापल्या पदांचा राजीनामा दिला होता. परंतु कार्यकारिणी सदस्यांपैकी पुरुषोत्तम शहाणे आणि अशोक वानखेडे यांनी स्वत:लाच या संस्थेचे अध्यक्ष व सचिव घोषित केले होते. त्यांना या बदलाबाबत धर्मादाय आयुक्तांची परवानगीही नाही.