शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्या शाहीस्नानासाठी आखाड्यांचं प्रस्थान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2019 07:04 IST

प्रयागराज लाखो भाविकांची गर्दी

थेट प्रयागराज येथून किरण अग्रवालप्रयागराज: त्रिशूळ, गदा, तलवारी नाचवत व डमरू वाजवत कुंभमेळ्यातील मकरसंक्रांतीच्या पहिल्या शाही स्नानासाठी संत महंतांच्या शोभा यात्रांना प्रारंभ झाला असून, कडाक्याच्या थंडीत धार्मिक आस्थेची उब उरी बाळगणारे लाखो भक्त पवित्र स्नानासाठी त्रिवेणी संगमावर पोहोचले आहेत. आखाडा परिषदेच्या शिरस्त्याप्रमाणे व परंपरेनुसार पहाटे 5.15 वाजता महानिर्वाणी व अटल आखाड्याने संगमाकडे प्रस्थान ठेवले तर 5.45 वाजता निरंजनी व आनंद आखाड्याची शोभायात्रा प्रारंभ झाली आहे. महानिर्वाणीचे आचार्य विश्वत्मानंद सरस्वती, स्वामी वासुदेवानंद सरस्वती आदी महामंडलेश्वर रथावर आहेत. निरंजनीचे महंत नरेंद्र गिरी, आनंद पिठाधिश्वर स्वामी बालकानंद गिरी व त्यांच्या पाठीमागे सोमेश्वरानंद गिरी, परमानंद गिरी, कालच महामंडलेश्वर म्हणून पट्टाभिषेक झालेल्या केंद्रीय राज्यमंत्री निरंजना ज्योती, विष्णुचैतन्य गिरी, गुरू माँ आनंदमयी, विद्यानंद गिरी, महेशानंद गिरी, सत्यानंद गिरी आदींचे फुलांनी सुसजजीत रथ आहेत. आखड्यांच्या इष्ट देवतांच्या पालख्या व धर्मध्वज अग्रभागी आहेत. गंगा, यमुना व सरस्वतीच्या संगमावर कुंभ स्नान होत असून स्नानास जाणाऱ्या संत महंतांचं दर्शन व आशिर्वादासाठी रस्त्याच्या दुतर्फा भक्तांची मोठी गर्दी झाली आहे. कुंभासाठी सोडलेल्या खास रेल्वे, एसटी व खासगी वाहनांद्वारे लाखो भाविक प्रयागराजला पोहोचत आहेत. संगमाकडे जाणाऱ्या सर्वच मार्गांवर कालपासूनच वाहनांना प्रवेशबंदी करण्यात येऊन वाहनं शहराबाहेर रोखली गेल्याने भाविकांना सुमारे 10 ते 12 किलोमीटर पायपीट करावी लागत आहे. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला असून संगम तटावर सुरक्षा रक्षक तैनात आहेत. ड्रोन कमेऱ्याद्वारे शाही मिरवणूक मार्गावर नजर ठेवली जात आहे. दुपारी 4 वाजेपर्यंत विविध आखड्यांचं शाही स्नान चालणार आहे. शैव पंथीयांचे 10 तर वैष्णवांचे 3 असे एकूण 13 आखाडे व त्यांच्या अंतर्गत असलेले खालसे यात सहभागी झाले आहेत. 

टॅग्स :Kumbh Melaकुंभ मेळाUttar Pradeshउत्तर प्रदेश