कुमारस्वामींच्या शपथविधीला विरोधकांचं शक्तिप्रदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2018 11:41 IST2018-05-20T11:41:33+5:302018-05-20T11:41:33+5:30
राज्यपाल वजूभाई वाला यांची भेट घेतल्यानंतर यासंबंधी घोषणा करण्यात आली.

कुमारस्वामींच्या शपथविधीला विरोधकांचं शक्तिप्रदर्शन
बंगळुरु : जनता दल सेक्युलरचे नेते एच. डी. कुमारस्वामी बुधवारी कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणार आहेत. कुमारस्वामी बुधवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. राज्यपाल वजूभाई वाला यांची भेट घेतल्यानंतर यासंबंधी घोषणा करण्यात आली. भाजपला एकजुटीचा इशारा देण्याची रणनीती विरोधकांनी आखली आहे. त्यामुळेच कुमारस्वामी जेव्हा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील, तेव्हा विरोधी पक्ष जोरदार शक्तिप्रदर्शन करणार आहेत. देशभरातील प्रमुख 17 विरोधी पक्षाच्या नेत्यांना निमंत्रण पाठवले असल्याची माहिती आहे.