कुमारमंगलम बिर्ला यांचीही सीबीआयकडून चौकशी
By Admin | Updated: January 22, 2015 00:07 IST2015-01-22T00:07:34+5:302015-01-22T00:07:34+5:30
नवी दिल्ली : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्यापाठोपाठ आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष कुमारमंगलम बिर्ला यांची सीबीआयने चौकशी केली आहे. बिर्ला यांच्या हिंडाल्को कंपनीला २००५ मध्ये तालाबिरा-२ कोळसा खाणप्यांचे वाटप करताना अनियमितता घडल्याचा आरोप आहे. सीबीआयने सादर केलेला क्लोजर रिपोर्ट विशेष न्यायालयाने फेटाळल्याच्या पार्श्वभूमीवर ही चौकशी झाली.

कुमारमंगलम बिर्ला यांचीही सीबीआयकडून चौकशी
न ी दिल्ली : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्यापाठोपाठ आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष कुमारमंगलम बिर्ला यांची सीबीआयने चौकशी केली आहे. बिर्ला यांच्या हिंडाल्को कंपनीला २००५ मध्ये तालाबिरा-२ कोळसा खाणपट्ट्यांचे वाटप करताना अनियमितता घडल्याचा आरोप आहे. सीबीआयने सादर केलेला क्लोजर रिपोर्ट विशेष न्यायालयाने फेटाळल्याच्या पार्श्वभूमीवर ही चौकशी झाली.डॉ. मनमोहनसिंग आणि तत्कालीन कोळसा सचिव पी.सी. पारख यांच्यासोबत झालेल्या भेटींबाबत बिर्ला यांना प्रश्न विचारण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. डॉ. मनमोहनसिंग यांच्याकडे त्याकाळी कोळसा मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार होता. या प्रकरणात पारख हे अन्य आरोपी आहेत. बिर्ला समूहाने याबाबत भाष्य टाळले आहे. सीबीआयचे मीडिया संपर्क प्रभारी संयुक्त संचालक आर.एस. भट्टी यांनीही उत्तर टाळले. डॉ. मनमोहनसिंग यांचे प्रधान सचिव टी.के.ए. नायर आणि स्वीय सचिव बी. व्ही. आर सुब्रमण्यम यांची यापूर्वीच चौकशी झाली आहे.