आपल्या कविता आणि राम कथेसाठी जगभरात प्रसिद्द असलेले कवि डॉ. कुमार विश्वास नेहमीच चर्चेत असतात. आता यावेळी त्यांनी कुणाचेही नाव न घेता केलेले एक वक्तव्य जबरदस्त चर्चेत आहे. त्यांचा या वक्तव्यासंदर्भातील व्हिडिओ देखील सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे आणि या वक्तव्याकडे सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांच्या लग्नाशी जोडून बघितले जात आहे.
डॉ. विश्वास यांनी मेरठ महोत्सवात हे विधान केल्याचे बोलले जात आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये कुमार विश्वास म्हणतात, "आपल्या मुलांकडून माता सीतेच्या बहिणी आणि प्रभू श्रीराम यांच्या भावांची नावे मुखद्गत करून घ्या. एक संकेत देत आहे, ज्यांना समजेल त्यांनी टाळ्या द्या." विश्वास पुढे म्हणतात, "अपल्या मुलांना रामायण ऐकवा, गीता शिकवा अन्यथा असे न होवो की, आपल्या घराचे नाव रामायण असेल आणि आपल्या घरातील 'श्री लक्ष्मी' कुणी दुसराच उचलून घेऊन जाईल."
मेरठ महोत्सवात आयोजित कविसंमेलनात कवी डॉ. कुमार विश्वास यांच्यासोबत कवयित्री कविता तिवारी, कवी सुदीप भोला, हेमंत पांडे, विनीत चौहान आदी उपस्थित होते. रात्री उशिरापर्यंत हा कार्यक्रम चालला. उपस्थितांनीही कार्यक्रमाचा मनसोक्त आनंद लुटला.
कुमार विश्वास यांची जादू - यावेली कुमार विश्वास यांच्या प्रेमावर आधारित कवितांमध्ये श्रोते मंत्रमुग्ध होऊन गेले होते. यावेळी कुमार विश्वास यांनी "कोई दीवाना कहता है, कोई पागल समझता है..." ही कविता गुणगुणायला सुरवात करताच, तरुणांमध्ये एक वेगळाच उत्साह संचारला. तसेच, कुमार विश्वास यांची रोमॅन्टिक कविता "जो धरती से अम्बर जोडे, उसका नाम मोहब्बत है,"वरही श्रोते तेवढ्याच उत्साहत दिसून आले.