शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
5
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
6
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
7
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
8
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
9
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
10
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
11
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
12
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
13
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
14
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
15
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
16
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
17
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
18
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
19
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 

Kumar Vishwas : कुमार विश्वास यांच्या घरी पंजाब पोलिसांचे पथक, फोटो शेअर करत भगवंत मान यांना दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2022 10:04 IST

Kumar Vishwas: कवी कुमार विश्वास यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर गंभीर आरोप केले होते, त्यामुळेच पोलिसांचे पथक त्यांच्या घरी दाखल झाल्याचे बोलले जात आहे.

नवी दिल्ली: आज सकाळी अचानक पंजाब पोलिसांचे (Punjab Police) पथक आम आदमी पक्षाचे (AAP) माजी नेते कुमार विश्वास(Kumar Vishwas ) यांच्या घरी दाखल झाले. कुमार विश्वास यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. यासंदर्भात त्यांनी काही छायाचित्रे ट्विट केली आहेत. या ट्विटमध्ये त्यांनी आपचे निमंत्रक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kerjiwal) यांच्यावर निशाणा साधत पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann)  यांना इशारा दिला आहे. 

कुमार विश्वास यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, "आज पहाटे अचानक पंजाब पोलीस दारात आले. एकेकाळी माझ्या हस्ते पक्षात सामील झालेल्या भगवंत मान यांना इशारा देतो की, दिल्लीत बसलेल्या व्यक्तीला (अरविंद केजरीवाल) तुम्ही पंजाबच्या जनतेने दिलेल्या सत्तेशी खेळू देत आहात. तो एक दिवस तुमचा आणि पंजाबचा विश्वासघात करेल, देशाने माझा इशारा लक्षात ठेवावा.''

कुमार विश्वास यांचे केजरीवालांवर गंभीर आरोपकुमार विश्वास यांनी ट्विटरवर त्यांच्या घराबाहेर उभ्या असलेल्या पोलिसांची छायाचित्रे ट्विट केली आहेत. कुमार विश्वास यांच्या घरात पोलीस का आले आहेत, याचे कारण अद्याप समोर आले नाही. पण, पंजाबमधील निवडणुकीदरम्यान कुमार विश्वास यांनी आपप्रमुख अरविंद केजरीवाल यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते. केजरीवाल यांचा कट्टरतावाद्यांशी संबंध असून, त्यांनी देश तोडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप विश्वास यांनी केला होता. याबाबत त्यांनी केजरीवाल यांच्याकडे उत्तरही मागितले होते. 

टॅग्स :AAPआपArvind Kejriwalअरविंद केजरीवालBhagwant Mannभगवंत मानPunjabपंजाबPoliceपोलिस