शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

विदेशी महिलेचा विनयभंग करणारा अटकेत; पोलिसांपासून वाचण्यासाठी लढवली शक्कल पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2023 13:31 IST

कुलदीप सिंग सिसोदिया असे आरोपीचे नाव असून बुधवारी त्याला बेड्या घालण्यात पोलिसांना यश आले.

जयपूर : राजस्थानमधील जयपूर येथे ब्रिटिश महिला पर्यटकाचा विनयभंग केल्याप्रकरणी बिकानेरच्या नोखा येथून आरोपीला अटक करण्यात आली आहे. कुलदीप सिंग सिसोदिया असे आरोपीचे नाव असून बुधवारी त्याला बेड्या घालण्यात पोलिसांना यश आले. स्थानिक विधायकपुरी पोलिसांनी आरोपी कुलदीपवर अटकेची कारवाई केली. 

दरम्यान, आरोपी कुलदीप सिंग हा पेशाने शिक्षक असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. आता त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे. जयपूर पोलिसांचे अतिरिक्त पोलीस आयुक्त कैलाशचंद्र बिश्नोई यांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हायरल झालेला व्हिडीओ १५ जून रोजी जयपूरमधील मोती लाल अटल रोडवरील हॉटेलबाहेरचा होता, असे तपासात समोर आले आहे.

बळजबरी केल्याप्रकरणी कारवाई मूळची ब्रिटनमधील असलेली एक महिला पर्यटक १४ जून ते १६ जून दरम्यान जयपूरमध्ये पर्यटनासाठी आली होती. ती तिच्या पतीसह एका हॉटेलमध्ये राहिली होती. तिथे १५ जून रोजी आरोपी कुलदीप सिंगने महिला पर्यटकाला एकटी पाहून तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. तिला बळजबरीने पकडून तो तिला पुन्हा पुन्हा स्पर्श करू लागला. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. घटनेनंतर आरोपीने बिकानेर गाठले आणि एका शाळेत शिक्षकाची नोकरी मिळवली असल्याचे कळते. 

आरोपीला अटकघटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर दिल्ली महिला आयोगाने राजस्थान पोलिसांना कारवाईसाठी पत्र लिहिले. यानंतर पोलिसांच्या सोशल मीडिया सेलने आणि सायबर पोलिसांनी घटनेचा अधिक तपास करून आरोपी कुलदीप सिंगला बेड्या घातल्या. एका व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला. लक्षणीय बाब म्हणजे आरोपीने ओळख पटू नये यासाठी दाढी, केस बारीक करून ओळख लपवण्याचा प्रयत्न केला होता. 

 

टॅग्स :Rajasthanराजस्थानCrime Newsगुन्हेगारीArrestअटकtourismपर्यटन