शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

Unnao Case : हत्येप्रकरणी माजी आमदार कुलदीप सेंगर दोषी, कोर्टाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2020 14:44 IST

Unnao Case : उन्नाव सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांच्या

मुंबई - उन्नाव बलात्कार आणि हत्याप्रकरणीतील पीडिताच्या वडिलांच्या हत्येबाबतच्या निर्णयावर आज न्यायालयात सुनावणी झाली. याप्रकरणी दिल्लीतील तीस हजारी कोर्टाने माजी आमदार कुलदीप सेंगर यांस सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात दोषी ठरवले आहे. मात्र, पीडितेच्या वडिलांना ठार करण्याचा हेतू आरोपीचा नव्हता, जमावाने केलेल्या अमानुष मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे. 

माजी आमदार कुलदीप सिंह सेंगर हाच दोषी असल्याचा निर्णय कोर्टाने दिला. ज्या पद्धतीने हत्या करण्यात आली ती अत्यंत अमानुष होती, असं निरीक्षण नोंदवत दिल्लीतील तीस हजारी कोर्टाने कुलदीप सिंह सेंगरला दोषी ठरवलं. या प्रकरणात माजी आमदार कुलदीप सिंह सेंगरसोबत 11 आरोपी होते. त्यापैकी 4 जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. तर इतर 7 जणांना कोर्टाने दोषी ठरवलं. याप्रकरणी 12 मार्च रोजी शिक्षा सुनावली जाणार आहे. न्यायालयाने कलम 304 आणि कलम 120 ब अंतर्गत कुलदीपसिंह सेंगरला दोषी ठरवण्यात आलं.

भाजपाचा निलंबित आमदार कुलदीप सेंगर याने उन्नाव येथे एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना 2017 साली घडली होती. याप्रकरणी 4 मार्चला न्यायालयात सुनावणी होती. तत्पूर्वी उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडित मुलीच्या वडिलांवर उपचार करणार्‍या डॉक्टर प्रशांत उपाध्याय यांचा सोमवारी सकाळी मृत्यू झाला. डॉ प्रशांत उपाध्याय हे ते डॉक्टर आहेत, ज्यांनी उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या वडिलांवर उपचार केले होते. उन्नाव सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांच्या एसआयटी पथकाने कोर्टात आरोपपत्र दाखल केले होते. 23 वर्षीय पीडित तरुणीवर सामूहिक बलात्कार केलेल्या नराधमांनी जामिनावर सुटून तिला जाळले. 90 टक्के भाजलेल्या तरुणीचा डिसेंबर 2019मध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याअगोदरच, तिच्या वडिलांची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी दिल्लीतील तीस हजारी कोर्टाने आज आरोपींना दोषी ठरवले आहे. याप्रकरणी शिक्षेसंबंधात पुढील अंतिम सुनावणी 12 मार्च रोजी होणार आहे. 

3 डिसेंबर 2019ला उन्नाव बलात्कार पीडितेची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात उपचार सुरु असताना हृदयविकाराचा झटका आल्याने तिचा मृत्यू झाला. बलात्कार प्रकरणात जामिनावर सुटलेल्या आरोपींनी पीडितेला सुनावणीसाठी जात असताना जिवंत जाळले. यात ती 90 टक्के भाजली होती. त्यानंतर सुरुवातीला तिला उपचारासाठी लखनऊच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर दिल्लीतील सफदरगंज रुग्णालयात हलविण्यात आले होते. सफदरजंग रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु होते. तिची प्रकृती अत्यंत नाजूक असल्याने व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान तिने अखेरचा श्वास घेतला.

टॅग्स :Unnao rape caseउन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरणCourtन्यायालयdelhiदिल्लीCrime Newsगुन्हेगारी