शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

कुलभूषणच्या आई, पत्नीला काढायला लावले मंगळसूत्र, बांगड्या अन् टिकलीही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 04:04 IST

नवी दिल्ली : हेरगिरी आणि विध्वंसक कारवाया केल्याच्या आरोपावरून फाशीची शिक्षा झालेले माजी भारतीय नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या पत्नी व आईने सोमवारी इस्लामाबादमध्ये त्यांची घेतलेली भेट ‘दबाव आणि भीतीच्या वातावरणात’ घडवून आणून पाकिस्तानने वचनभंग केल्याचा आरोप भारताने केला आहे.

नवी दिल्ली : हेरगिरी आणि विध्वंसक कारवाया केल्याच्या आरोपावरून फाशीची शिक्षा झालेले माजी भारतीय नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या पत्नी व आईने सोमवारी इस्लामाबादमध्ये त्यांची घेतलेली भेट ‘दबाव आणि भीतीच्या वातावरणात’ घडवून आणून पाकिस्तानने वचनभंग केल्याचा आरोप भारताने केला आहे.कुलभूषण यांची आई अवंती व पत्नी चेतनकुल यांनी इस्लामाबादहून परत आल्यानंतर मंगळवारी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेतली. त्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने एक सविस्तर निवेदन प्रसिद्ध करून सोमवारची भेट ज्या पद्धतीने आयोजित केली गेली त्याबद्दल पाकिस्तानवर टीका केली. या भेटीच्या निमित्ताने जाधव यांच्यावरील धादांत खोट्या आरोपांना बळकटी देण्याची संधी घेण्याचा प्रयत्न करून पाकिस्तानने विश्वासार्हता पार गमावली, असेही प्रवक्ता म्हणालाप्रवक्ता म्हणाला की, ही भेट कशा पद्धतीने व्हावी याचा सर्व तपशील दोन्ही देशांच्या राजनैतिक अधिकाºयांनी आपसात चर्चा करून आधी ठरविला होता. त्यानुसार भारताने ठरल्याप्रमाणे आपली बाजू चोखपणे पार पाडली. परंतु पाकिस्तानने मात्र दिलेला शब्द पाळला नाही.यासंदर्भात प्रवक्त्याने प्रामुख्याने चार बाबींचा आवर्जून उल्लेख केला. १) माध्यम प्रतिनिधींना जाधव यांच्या पत्नी व आईच्या जवळ जाऊ द्यायचे नाही, असे ठरले असूनही पाकिस्तानी माध्यमांच्या प्रतिनिधींना त्यांच्या अगदी जवळ जाऊ दिले गेले. जवळ आल्यावर या प्रतिनिधींनी या दोघींचा पिच्छा पुरवून त्यांना त्रास दिला व जाधव यांच्याविषयी अपमानास्पद भाष्ये केली. २) सुरक्षेच्या नावाखाली या दोघींच्या सांस्कृतिक व धार्मिक भावनांचा अनादर केला गेला. यात त्यांना मंगळसूत्र, बांगड्या व कपाळावरील टिकलीही काढून ठेवायला लावली व सुरक्षेच्या दृष्टीने गरजचे नसूनही पेहराव बदलायला लावला. ३) जाधव यांच्या आईची मातृभाषा मराठी असल्याने त्यांनी मुलाशी त्या भाषेत बोलणे स्वाभाविक होते. परंतु त्या मराठीत बोलू लागल्यावर वारंवार त्यांना थांबविले गेले व शेवटी मराठी बोलणे बंद करायला लावले गेले. ४) भेटीच्या वेळी पाकिस्तानमधील भारतीय उप उच्चायुक्त जे. पी. सिंग हजर राहू शकतील, असे आधी ठरले होते. परंतु ऐनवेळी न कळवताच त्यांना या दोघींपासून वेगळे केले गेले. सिंग यांच्या गैरहजेरीतच भेट सुरू केली गेली. संबंधितांकडे आग्रह धरल्यावर सिंग यांना आत प्रवेश दिला गेला; पण तरीही त्यांना आणखी एका तावदानापलीकडे उभे करून प्रत्यक्ष भेटीच्या ठिकाणी हजर राहू दिले गेले नाही.प्रवक्ता म्हणाला की, भेटीविषयी जी माहिती मिळाली त्यावरून या दोघींच्या दृष्टीने भेटीचे एकूणच वातावरण दबाव आणि भीतीचे होते. तरीही त्यांनी मोठ्या धैर्याने व निग्रहाने त्यास तोंड दिले.>पत्नी अनवाणी परतलीभेटीच्या खोलीत जाण्याआधी जाधव यांच्या पत्नी व आईला त्यांची पादत्राणे बाहेर काढून ठेवायला सांगितले गेले. मात्र भेटीनंतर, वारंवार विनंती करूनही जाधव यांच्या पत्नीला त्यांचे बूट परत दिले गेले नाहीत. असे का केले गेले हे अनाकलनीय आहे.>प्रकृतीविषयी चिंताभेटीच्या वेळी कुलभूषण जाधव कमालीच्या दबावाखाली होते व ते बळजबरी केल्यासारखे बोलत होते. त्यांची बहुतांश वक्तव्ये, त्यांच्याविरुद्धच्या खोट्या आरोपांना बळकटी देण्यासाठी, पढवून घेतल्यासारखी वाटत होती. त्यांची एकूण भावमुद्रा त्यांच्या प्रकृती व ख्यालीखुशालीबद्दल चिंता निर्माण करणारी होती. - प्रवक्ता, परराष्ट्र मंत्रालय

टॅग्स :Kulbhushan Jadhavकुलभूषण जाधवPakistanपाकिस्तान