शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

Live : पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाच्या कार्यालयात कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत कुलभूषण जाधव यांची आई-पत्नीसोबत झाली भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2017 15:19 IST

हेरगिरी केल्याच्या आरोपावरुन पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय नागरिक व भारतीय नौदलातील निवृत्ती अधिकारी कुलभूषण जाधव दीड वर्षांनंतर कुटुंबीयांना भेटले.

नवी दिल्ली -  हेरगिरी केल्याच्या आरोपावरुन पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय नागरिक व भारतीय नौदलातील निवृत्ती अधिकारी कुलभूषण जाधव आज दीड वर्षांनंतर कुटुंबीयांना भेटले आहेत. पाकिस्तानातील कोर्टानं कुलभूषण जाधव यांनी मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे.  कुलभूषण जाधव यांची आई अवंतिका जाधव आणि पत्नीसोबत इस्लामाबाद येथील पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या कार्यालयात भेट झाली. या भेटीच्या पार्श्वभूमीवर पाकिस्ताननं अत्यंत कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. पाकिस्ताननं सुरक्षा व्यवस्थेत शार्प शूटर, पाकिस्तानीर रेंजर्स आणि निमलष्करी दलदेखील तैनात केले होते. दरम्यान, जाधव कुटुंबीयांसोबत भारताचे उप-उच्चायुक्त जे.पी.सिंह आणि पाकिस्तानी महिला अधिकारीदेखील होत्या.

ज्या मार्गावर परराष्ट्र मंत्रालयाचे कार्यालय स्थित आहे तेथे सर्वसामान्य नागरिकांना बंदी घालण्यात आली आहे. पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाच्या कार्यालयाबाहेर मीडिया कर्मचा-यांचीही प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. जाधव कुटुंबीय पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाच्या कार्यालय परिसरात दाखल झाल्यानंतर त्यांनी मीडियाला अभिवादनदेखील केले, मात्र कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकर दिला. 

जाधव कुटुंबीय दुबईमार्गे इस्लामाबाद येथे दाखल झाले. या भेटीचे फोटो आणि व्हिडीओ प्रसिद्ध करणार असल्याचे पाकिस्ताननं सांगितले होते. याव्यतिरिक्त जर भारतानं परवानगी दिली तर त्यांच्या कुटुंबीयांना मीडियासोबत बातचित करण्याचीही परवानगी देण्यात येईल.  दरम्यान, यानंतर जाधव यांचे कुटुंबीय मीडियासोबत बातचित करणार नसल्याचे पाकिस्तानी अधिका-यांनी सांगितले.  

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

पाकिस्तानकडून पुन्हा दिशाभूल करण्याचा प्रयत्न

मात्र, सकाळपासूनच या भेटीबाबत गोंधळ निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. काही वेळापूर्वीच पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री ख्वाजा आसिफ यांनी पाकिस्ताकडून भारताला कुलभूषण जाधव यांचा कॉन्स्युलर अॅक्सेस देण्यात आल्याचे सांगितले. मात्र, भारताकडून हे वृत्त फेटाळण्यात आले होते. त्यामुळे कुलभूषण जाधव यांच्या कॉन्स्युलर अॅक्सेसवरून अजूनही संभ्रम आहे. कुलभूषण जाधव यांची आई आणि पत्नीसोबतची भेट साधारण 12.30 वाजता होईल. त्यांना भेटण्यासाठी केवळ 15 मिनिटांचा अवधी देण्यात आला आहे. मात्र,  तुरुंगातील नियमांचा दाखला देत पाकिस्तानने या भेटीत आडकाठी घातली आहे. त्यामुळे ही भेट आणखी काही काळ लांबण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.ख्वाजा आसिफ यांनी जिओ वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, कुलभूषण जाधव आज त्यांच्या आई व पत्नीला भेटतील. त्यावेळी भारतीय अधिकारीही उपस्थित राहू शकतील. परंतु, आमच्या जागी भारत असता तर त्यांनी आम्हाला कॉन्स्युलर अॅक्सेस दिला असता का, असा खोचक प्रश्नही ख्वाजा आसिफ यांनी विचारला.  

 

20 डिसेंबर रोजी कुलभूषण जाधव यांच्या आई आणि पत्नीला पाकिस्तानने व्हिसा जारी केला होता. त्यामुळे मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आलेल्या कुलभूषण जाधव यांची भेट घेण्यासाठी जाण्याचा कुटुंबीयांचा मार्ग मोकळा झाला.  हेरगिरी व दहशतवादाच्या आरोपावरून जाधव यांना पाकच्या लष्करी न्यायालयाने देहदंडाची शिक्षा सुनावली. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने भारताच्या अपिलावरून मे महिन्यात शिक्षेला स्थगिती दिली होती. त्यामुळे जगभरात पाकिस्तानची चांगलीच नाचक्की झाली होती. 

तात्काळ फाशीचा धोका नाही, पाकिस्तानची माहितीआई आणि पत्नीला दिलेली भेटीची संधी ही शेवटची संधी ठरणार नाही, अशी माहिती पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते डॉ. मोहम्मद फैसल यांनी दिली आहे. गुरूवारी या संदर्भातील माहिती समोर आली. कुलभूषण जाधव यांच्या आई आणि पत्नीला त्यांच्या भेटीसाठी दिलेली परवानगी ही पूर्णपणे मानवतेच्या दृष्टीने देण्यात आली असून कुलभूषण जाधव यांना तात्काळ फाशीचा कुठलाच धोका नाही, असं गुरूवारी झालेल्या साप्ताहिक बैठकीत डॉ.मोहम्मद फैसल यांनी म्हटलं. कुलभूषण जाधव यांची दया याचिका अजूनही प्रलंबित असल्यानं ही बाब स्पष्ट होते, असंही ते म्हणाले. कुलभूषण जाधव यांची त्यांच्या कुटुंबीयांशी भेट झाल्यावर त्यांना तात्काळ फाशी देण्यात येईल का ? यांसारख्या प्रश्नावर मोहम्मद फैसल यांनी उत्तरं दिली आहेत. 

कुलभूषण जाधव यांच्या आईला आणि पत्नीला भेटीसाठी देण्यात आलेली संधी ही इस्लामी परंपरेनुसार पूर्णपणे मानवतेचा विचार करुन देण्यात आली आहे. पाकिस्तान सरकारने या दोघींनाही व्हिसा मंजूर केला आहे. त्यांची जाधव यांच्याशी पाकिस्तानातील परराष्ट्र मंत्रालयात भेट होणार आहे. यावेळी त्यांच्यासोबत भारतीय उच्चायुक्तांमधील एका प्रतिनिधीलाही जाण्याची परवानगी देण्यात येईल, असंही डॉ. फैसल यांनी म्हंटलं. पाकिस्तानकडून जाधव यांच्या आई आणि पत्नीला माध्यमांशी बोलण्याचीही परवानगी दिली जाणार आहे. या संदर्भात आम्ही भारताच्या निर्णयाची वाट पाहत असल्याचं फैसल यांनी सांगितलं. 

टॅग्स :Kulbhushan Jadhavकुलभूषण जाधवPakistanपाकिस्तानIndiaभारत