कुलभूषण जाधव यांचा जीव वाचवणं गरजेचं- ओवैसी

By Admin | Updated: April 11, 2017 12:14 IST2017-04-11T12:00:31+5:302017-04-11T12:14:24+5:30

पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या कुलभूषण जाधव यांचा जीव वाचवणं गरजेचं असल्याचं मत लोकसभेत एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी मांडलं

Kulbhushan Jadhav needs to save his life - Owaisi | कुलभूषण जाधव यांचा जीव वाचवणं गरजेचं- ओवैसी

कुलभूषण जाधव यांचा जीव वाचवणं गरजेचं- ओवैसी

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 11 - पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या कुलभूषण जाधव यांचा जीव वाचवणं गरजेचं असल्याचं मत लोकसभेत एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी मांडलं आहे. कुलभूषण यांच्या बचावासाठी मोदी सरकारनं स्वतःची सर्व शक्ती पणाला लावण्याची गरज आहे. कुलभूषण जाधव यांना भारतात परत आणा, असंही ते म्हणाले आहेत. लोकसभेत आज कुलभूषण जाधव यांच्या मुद्द्यावर चर्चा झाली असता, त्यांना भारतात परत आणण्यासाठी प्रयत्न करा, असा सल्ला काँग्रेसनं दिला. त्यानंतर विविध पक्षांच्या खासदारांनी कुलभूषण जाधव यांच्या प्रकरणावर स्वतःची मतं मांडली आहेत.

ओवैसी म्हणाले, मला कुलभूषण जाधव प्रकरणाचे अजिबात राजकारण करायचं नाही. पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयानं त्यांना फाशीची शिक्षा दिली आहे. मात्र या खटल्याबाबतची माहिती मोदी सरकारला असायला हवी होती. आता कुलभूषण जाधव यांचा जीव वाचवण्यासाठी निकरीचे प्रयत्न करण्याची गरज असून, तेच आपल्या सर्वांचं प्रथम कर्तव्य आहे, असंही ते म्हणाले आहेत.

आता तरी मोदी सरकारने दबावतंत्राचा वापर करावा, मोदींनी सर्व शक्ती पणाला लावून कुलभूषण जाधव यांचा जीव वाचवावा. गरज पडल्यास आंतरराष्ट्रीय पातळीवरून पाकिस्तानवर दबाव टाकावा. पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयानं कोणतेही पुरावे नसताना थेट कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षाची सुनावली. पुरावे नसतानाही पाकिस्तान नाटक करत आहे. तरीही कुलभूषण जाधव यांना वाचवणं हेच आपलं पहिलं ध्येय्य असायला, असंही ओवैसी म्हणाले आहेत.

Web Title: Kulbhushan Jadhav needs to save his life - Owaisi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.