शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

Kulbhushan Jadhav: हरिश साळवेंनी किती मानधन घेतलं; जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2019 7:52 PM

हरिश साळवेंनी घेतलेल्या मानधनाची माहिती सुषमा स्वराज यांनी दिली होती

हेग: पाकिस्तानच्या अटकेत असलेले भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या सुटकेप्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयानं भारताच्या बाजूनं निकाल दिला आहे. जाधव यांच्या शिक्षेला देण्यात आलेली स्थगिती न्यायालयानं कायम ठेवली आहे. याशिवाय जाधव यांना सुनावण्यात आलेल्या शिक्षेचा पुनर्विचार करण्याचे आदेश पाकिस्तानला न्यायालयाकडून देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे. या प्रकरणात वरिष्ठ वकील हरिश साळवेंनी भारताची बाजू मांडली. न्यायालयात हरिश साळवेंनी केलेला युक्तिवाद अतिशय महत्त्वाचा ठरला. त्यामुळेच १६ न्यायाधीशांच्या खंडपीठानं १५-१ असा निकाल दिला आणि भारताला मोठा दिलासा मिळाला. न्यायालयाच्या निर्णयानंतर हरिश साळवे पुन्हा एकदा चर्चेत आले. देशातील प्रख्यात वकिलांपैकी एक असलेल्या साळवेंची एक दिवसाची फीज २५-३० लाख रुपये असल्याचं बोललं जातं. मात्र त्यांनी कुलभूषण प्रकरणात भारताची बाजू मांडण्यासाठी केवळ १ रुपया घेतला. सुषमा स्वराज परराष्ट्र मंत्री असताना त्यांना ट्विटरवर एकानं याबद्दल प्रश्न विचारला होता. त्यावेळी स्वराज यांनी साळवे घेत असलेल्या फीजची माहिती दिली होती. हरिश साळवेंनी अनेक महत्त्वाच्या खटल्यांमध्ये युक्तिवाद केलेला आहे. २०१५ मध्ये हिट अँड रन प्रकरणात सलमान खानला ५ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. त्यानंतर त्याला थेट आर्थर रोड तुरुंगात नेण्याची तयारी केली जात होती. मात्र साळवे यांनी न्यायालयात सलमानची बाजू मांडली आणि नाट्यमय घडामोडी घडल्या. यानंतर सलमानला जामीन मिळाला. यासोबत साळवेंनी व्होडाफोन कर प्रकरण, रिलायन्स गॅस वाद अशा महत्त्वपूर्ण खटल्यांमध्ये युक्तिवाद केला आहे.

टॅग्स :Kulbhushan Jadhavकुलभूषण जाधवIndiaभारतPakistanपाकिस्तानSushma Swarajसुषमा स्वराज