शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Kulbhushan Jadhav: न्यायालयात कसाबचा संदर्भ दिला अन् पाकिस्तान फसला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2019 15:24 IST

कुलभूषण जाधव प्रकरणात पाकिस्तान तोंडघशी

नवी दिल्ली: कुलभूषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयानं पाकिस्तानला धक्का दिला. पाकिस्तानच्या अटकेत असलेले भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या सुटकेप्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयानं भारताच्या बाजूनं निकाल दिला. जाधव यांच्या शिक्षेला देण्यात आलेली स्थगिती न्यायालयानं कायम ठेवली आहे. याशिवाय जाधव यांना सुनावण्यात आलेल्या शिक्षेचा पुनर्विचार करण्याचे आदेश पाकिस्तानला न्यायालयाकडून देण्यात आले आहेत. पाकिस्ताननं या खटल्यात २६/११ हल्ल्यातील दहशतवादी कसाबचा संदर्भ दिला. मात्र यामुळे पाकिस्तान फसला.पाकिस्ताननं आंतरराष्ट्रीय न्यायालयात मुंबईवरील हल्ल्याप्रकरणी फाशी देण्यात आलेल्या अजमल कसाबचा उल्लेख केला. कसाबची तुलना कुलभूषण यांच्याशी करण्याचा प्रयत्न पाकिस्ताननं केला. भारतातही सैन्याच्या न्यायालयात सुनावणी घेतली जाते, असा युक्तिवाद पाकिस्तानकडून करण्यात आला. मात्र भारतानं पाकिस्तानचा खोटेपणा न्यायालयासमोर उघड केला. कसाबवरील खटल्याची सुनावणी न्यायालयात लाईव्ह झाली होती, हे भारताकडून स्पष्ट करण्यात आलं. 'कसाबचा खटला लढवण्यासाठी स्वतंत्र वकील देण्यात आला होता. एका माजी सॉलिसिटर अ‍ॅडिशनल जनरलनं न्यायालयात कसाबची बाजू मांडली. निष्पक्ष सुनावणीसाठी भारतानं सर्व प्रकारचे प्रयत्न केले. अनेकदा सर्वसामान्य भारतीयाला जी न्यायालयीन मदत मिळत नाही, ती कसाबला देण्यात आली,' हे भारतानं पुराव्यासह न्यायालयाला पटवून दिलं. 26 नोव्हेंबर २००८ ला लष्कर ए तोयबाच्या १० दहशतवाद्यांनी समुद्रमार्गे मुंबईत प्रवेश केला. त्यामध्ये कसाबचा समावेश होता. कसाब आणि त्याच्या साथीदारांनी केलेल्या हल्ल्यात परदेशी नागरिकांसह १६५ जणांचा मृत्यू झाला. कसाबला मुंबईतील न्यायालयानं दोषी ठरवलं. सर्वोच्च न्यायालयानं ही शिक्षा कायम ठरवली. पुण्यातील येरवडा कारागृहात कसाबला फाशी देण्यात आली.  

टॅग्स :Kulbhushan Jadhavकुलभूषण जाधवPakistanपाकिस्तानIndiaभारत