कुडतरी जिमखाना उपांत्य फेरीत
By Admin | Updated: August 16, 2015 23:44 IST2015-08-16T23:44:26+5:302015-08-16T23:44:26+5:30

कुडतरी जिमखाना उपांत्य फेरीत
>मडगाव : कुडतरी जिमखानातर्फे आयोजिलेल्या 26 व्या कुडतरी पंचायत चषक आंतरग्राम फुटबॉल स्पर्धेच्या सामन्यात कुडतरी जिमखाना संघाने जॉएल फर्नाडीसने नोंदवीलेल्या एकमेव गोलाच्या बळावर सेंट अँथनी क्लब कोलवा संघाचा 1-0 गोलाने पराभव केला या बरोबरच त्यांनी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. कुडतरी येथील चर्चच्या मैदानावर खेळविण्यात आलेल्या या समान्यात 9 व्या मिनीटाला जॉएल फर्नाडीसने झेवियर डायसने दिलेल्या पासवर केला. त्यापूर्वी कोलवाच्या संघालापेनल्टीवर गोल करण्याची संधी प्राप्त झाली होती पण संगाच्या खेळाडूने ती दवडली.याबरोबर कुडतरीच्या नेल्सन फर्नाडीसने बचावफळीवर उत्कृष्ट प्रदशर्न केले.