कुडचडेत नृत्य स्पर्धेचे आयोजन

By Admin | Updated: August 11, 2015 00:03 IST2015-08-11T00:03:36+5:302015-08-11T00:03:36+5:30

सावर्डे (लो.प्र.) : कुडचडे येथील प्रेरणा सांस्कृतीक मंडळातर्फे यंदाही दुसरी अखिल गोवा नृत्य स्पर्धा आयोजीत करण्यात आलेली असून या कार्यक्रमांतून जो निधी गोळा होणार आहे तो सरकारमार्फत नेपाळ येथील पुरग्रस्थांसाठी देण्यात येणार असल्याचे मंडळाचे अध्यक्ष विशेष रायसू नाईक यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले.

Kudchadeet Dance Competition | कुडचडेत नृत्य स्पर्धेचे आयोजन

कुडचडेत नृत्य स्पर्धेचे आयोजन

वर्डे (लो.प्र.) : कुडचडे येथील प्रेरणा सांस्कृतीक मंडळातर्फे यंदाही दुसरी अखिल गोवा नृत्य स्पर्धा आयोजीत करण्यात आलेली असून या कार्यक्रमांतून जो निधी गोळा होणार आहे तो सरकारमार्फत नेपाळ येथील पुरग्रस्थांसाठी देण्यात येणार असल्याचे मंडळाचे अध्यक्ष विशेष रायसू नाईक यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले.
येत्या दि. 29 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6 वाजता कुडचडे येथील रविंद्र भवनमध्ये होणार्‍या नृत्य स्पर्धेचे खास आकर्षण म्हणून सारेगमा फेम तसेच विविध टीव्ही चैनलच्या रियेलिटी शो मध्ये आपली आगळी वेगळी छाप पाडलेले नृत्य कलाकार कमलेश पटेल यांना निमंत्रीत करण्यात आले आहे असेही यावेळी सांगितले.
सध्या यंदाच्या वषीर्ही असाच प्रातिसाद लाभेल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. स्पर्धेसाठी प्रथम 20 हजार, दुसरे 15 हजार व तिसरे 10 हजार व चषक अशी बक्षिसे आहेत. पत्रकार परिषदेला उपस्थितत असलेले मंडळाचे संस्थापक व आधारस्तंभ रायसू नाईक यांनी अशा प्रकारचे विविध कार्यक्रम संस्थेतर्फे राबविले जात असून त्यांना आपला संपूर्ण पाठिंबा असल्याचे ते म्हणाले. कार्यक्रमांच्या अधिक संपर्कासाठी अध्यक्ष विशेष नाईक यांच्याशी संपर्क साधावा.
ओळी : प्रेरणा सांस्कृतिक मंडलाच्या पत्रकार परिषदेत बोलताना विशेष नाईक बाजूला प्रज्योत नाईक, रायसू नाईक कार्याध्यक्ष विश्वजीत नाईक, मधू देसाई दिसत आहेत. (आनंद मंगेश नायक)

Web Title: Kudchadeet Dance Competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.