हेमा मालिनी मथुरेत बनविणार कृष्ण थीम पार्क

By Admin | Updated: March 22, 2017 17:03 IST2017-03-22T17:03:10+5:302017-03-22T17:03:10+5:30

मथुरेत आंतरराष्ट्रीय दर्जाचे कृष्ण थीम पार्क बनवण्याचे अभिनेत्री आणि भाजपा खासदार हेमा मालिनी यांचे स्वप्न आहे.

Krishna Theme Park, which will be built in Hema Malini Mathura | हेमा मालिनी मथुरेत बनविणार कृष्ण थीम पार्क

हेमा मालिनी मथुरेत बनविणार कृष्ण थीम पार्क

>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 22 - मथुरेत आंतरराष्ट्रीय दर्जाचे कृष्ण थीम पार्क बनवण्याचे अभिनेत्री आणि भाजपा खासदार हेमा मालिनी यांचे स्वप्न आहे. त्यासाठी हेमा मालिनी यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडे निधीची मागणी केली आहे. 
लोकसभेत वित्त विधेयकावर सध्या चर्चा सुरु आहे. यामध्ये हेमा मालिनी यांनी भाग घेतला असून त्यांनी आपला मतदारसंघ असलेल्या मथुरेत आंतरराष्ट्रीय दर्जाचे कृष्ण थीम पार्क बनवण्याचा निर्णय घेतला आहे. या कृष्ण थीम पार्कसाठी लागणारा निधी उपलब्ध व्हावा यासाठी त्यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडे प्रस्ताव ठेवला आहे. 
यावेळी हेमा मालिनी म्हणाल्या की, येथील धार्मिक पर्यटन स्थळांवर वायफाय सुविधा, स्थानिक पोलीस दल आणि विशेष पर्यटन पोलीस यांची व्यवस्था उभारणे गरजेचे आहे. यासाठी केंद्र सरकारने लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच, या ठिकाणी तीन केंद्रीय विद्यालयांची स्थापना करण्याची मागणी सुद्धा हेमा मालिनी यांनी केली आहे. 

Web Title: Krishna Theme Park, which will be built in Hema Malini Mathura