शहरं
Join us  
Trending Stories
1
गौतम गंभीरचे प्रयोग टीम इंडियाला झेपेना; दीड वर्षात नंबर ३ वर खेळवले तब्बल सात फलंदाज
2
आई आमदार बनली, पण मंत्रिपद मुलाला मिळालं; नितीश कुमारांच्या नव्या सरकारमध्ये संधी, सगळेच हैराण
3
Mumbai: मुंबईकरांसाठी खुशखबर...! नव्या इमारतीतील घरांसाठी नोंदणी शुल्क माफ
4
BJP vs Shinde Sena: मुद्रांक शुल्क सवलतीच्या निर्णयावरून शिंदेसेना-भाजपमध्ये क्रेडिट वॉर सुरू!, कोण काय बोलतंय? वाचा
5
आजचे राशीभविष्य - २१ नोव्हेंबर २०२५, कार्यपूर्ती, यश आणि कीर्ती मिळविण्याच्या दृष्टीने अनुकूल दिवस
6
Elections: मुंबईत ११.८० लाख तर, ठाण्यात ४.२१ लाख मतदार वाढले; महिला मतदारांची संख्या अधिक!
7
SC: राज्यपाल, राष्ट्रपतींना विधेयकांच्या मंजुरीसाठी डेडलाइन देता येणार नाही, न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
8
India- Israel: भारत-इस्रायल समृद्धीचे नवे पर्व सुरू, मुक्त व्यापारासाठी उभयतांत सहमती
9
काँग्रेस सिद्धारामय्यांना हटवणार? कर्नाटकात CM पदावरून पुन्हा वाद पेटला, डीके गटातील आमदारांनी दिल्लीत तळ ठोकला
10
चीन-जपान तणावात भारताची 'बल्ले-बल्ले'! झाला बंपर फायदा, बाजार 11% नं वधारला; आता ट्रम्प टॅरिफचं 'नो-टेंशन'!
11
पाकिस्तानचे डोळे उघडले! चक्क चक्क चिनी कंपन्यांना ठणकावले; म्हणाले, 'आमची लूट थांबवा, अन्यथा काम बंद करा'
12
"बौद्ध धर्माचे पालन करतो, पण..., आज जो काही आहे तो..."; निवृत्तीपूर्वी CJI बीआर गवई यांचं मोठं विधान!
13
विशेष लेख: मिस्टर/मिसेस 'पसेंटेज' आणि बंगल्यावरचे 'ठेके'
14
लेख: बिन भिंतींच्या उघड्या शाळेत तुमचे स्वागत आहे...
15
जेव्हा मुख्यमंत्री नितीश कुमार पंतप्रधान मोदींच्या पायाला स्पर्श करण्यासाठी वाकले..., पाटणा विमानतळावरील 'आदराचं' अद्भुत दृश्य - Video
16
भाजपने आणखी एक नगरपालिका बिनविरोध जिंकली; मविआच्या तिन्ही उमेदवारांनी अर्ज मागे घेतले... 
17
Breaking: भारत - इस्रायल समृद्धीच्या नव्या पर्वाचे 'टेक ऑफ'; मुक्त व्यापार करार, थेट विमानसेवा अन् बरंच काही...
18
मोठी बातमी! लुधियाना टोल प्लाझाजवळ पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये भीषण चकमक; परिसरात गोळीबाराचा आवाज
19
IND vs SA: शुबमन गिलच्या दुखापतीबद्दल बॅटिंग कोचने दिली महत्त्वाची अपडेट, म्हणाले...
20
२०० महिलांनी कोर्टातच घेतला जीव; मालेगावात जे घडता घडता राहिलं ते नागपूरमध्ये झालं होतं
Daily Top 2Weekly Top 5

बिहार निवडणुकीत कोविड रुग्णांनाही करता येणार मतदान, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2020 13:41 IST

कोरोना रुग्णांसाठी मतदानाची स्वतंत्र व्यवस्था असून मतदान केंद्रावर शेटवच्या क्षणी ते मतदानाचा हक्क बजावतील. कोरोनाचं संकट लक्षात घेऊन एका मतदान केंद्रावर एक हजार मतदारांनाच मतदान करता येणार आहे

ठळक मुद्देकोरोना रुग्णांसाठी मतदानाची स्वतंत्र व्यवस्था असून मतदान केंद्रावर शेटवच्या क्षणी ते मतदानाचा हक्क बजावतील. कोरोनाचं संकट लक्षात घेऊन एका मतदान केंद्रावर एक हजार मतदारांनाच मतदान करता येणार आहे.

मुंबई - कोरोना महामारीच्या संकटाचा सामना करतच बिहारमधील विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. या निवडणुकांच्या तारखांची घोषणा करण्यात आली असून तीन टप्प्यात ही निवडणूक पार पडणार आहे. मात्र, कोविड रुग्णांना या निवडणुकीत मतदान करता येईल का? त्यांनी कसं मतदान करायचं? यांसह अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने कोविड रुग्णांसाठी मतदानाची वेळ निश्चित केली आहे. 

कोरोना रुग्णांसाठी मतदानाची स्वतंत्र व्यवस्था असून मतदान केंद्रावर शेटवच्या क्षणी ते मतदानाचा हक्क बजावतील. कोरोनाचं संकट लक्षात घेऊन एका मतदान केंद्रावर एक हजार मतदारांनाच मतदान करता येणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी निवडणुकांच्या तारखांची घोषणा केली असून कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मास्क, सॅनिटायझर्स आणि गर्दी टाळून ही निवडणूक प्रक्रिया पार पाडण्याचा प्रयत्न असणार आहे. यंदाच्या निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाला 6 लाख पीपीई कीट देण्यात येणार असून 46 लाख मास्कचेही वाटप करण्यात येणार आहे. राज्यात 7 लाख सॅनिटायझर्सचा वापर केला जाईल, तसेच 6 लाख फेस शील्डचाही उपयोग करण्यात येईल. 

निवडणूक आयोगाने माहिती देताना, 18 लाख प्रवासी मजदूर असून त्यापैकी 16 लाख मजूर मतदानाचा हक्क बजावतील, असे सांगण्यात आले आहे. 80 वर्षे वयाच्या नागरिकांना पोस्टल बॅलेटद्वारे मतदान करता येईल. प्रत्येक पोलिंग बुथवर साबण, सॅनिटायझरसह अन्य सुविधांचा उपयोग करण्यात येणार आहे. तसेच मतदानाची वेळही एक तास वाढविण्यात आली असून सकाळी 7 वाजल्यापासून ते सायंकाळी 5 ऐवजी 6 वाजेपर्यंत मतदान घेण्यात येईल. 

बिहारमध्ये 243 जागांसाठी निवडणुका

बिहारमध्ये विधानसभेच्या 243 जागा असून जदयू, भाजपामध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला ठरविताना रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. "कोरोनाचे संकट असल्याने जगातील 70 देशांमध्ये निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. बिहारमधील ही निवडणूक कोरोना काळातील सर्वात मोठी निवडणूक आहे. कोरोना काळातील ही पहिलीच विधानसभा निवडणूक असल्याने केंद्रीय निवडणूक आयोगानं यासंदर्भात नियमावली जाहीर केली आहे. सोशल डिस्टन्सिंग पाळण्याच्या दृष्टीनं मतदान केंद्रांची संख्याही वाढवण्यात आली आहे" अशी माहिती सुनील अरोरा यांनी दिली आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूक 2020vidhan sabhaविधानसभाVotingमतदान