शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कोरेगाव भीमा प्रकरण : राजकीय पक्षाची साक्ष काढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2018 05:59 IST

कोरेगाव भीमा हिंसाचारात काही राजकीय पक्षांचा हात असल्याचा आरोप करण्यात आला असल्याने राज्यातील सर्व राजकीय पक्षांची साक्ष नोंदविणार असल्याचे या प्रकरणाच्या चौकशी आयोगाने सोमवारी स्पष्ट केले.

मुंबई : कोरेगाव भीमा हिंसाचारात काही राजकीय पक्षांचा हात असल्याचा आरोप करण्यात आला असल्याने राज्यातील सर्व राजकीय पक्षांची साक्ष नोंदविणार असल्याचे या प्रकरणाच्या चौकशी आयोगाने सोमवारी स्पष्ट केले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोरेगाव भीमा हिंसाचाराबद्दल विधानसभेत केलेल्या वक्तव्याबाबत आयोगाने त्यांचीही साक्ष नोंदवावी, अशी मागणी करणारा अर्ज सामाजिक कार्यकर्ते संजय लाखे-पाटील यांनी काही दिवसांपूर्वी आयोगापुढे सादर केला आहे. याचाच आधार घेत भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही देवेंद्र फडणवीस यांना साक्षीदार म्हणून बोलाविण्याची विनंती आयोगाला केली. आंबेडकर या प्रकरणी स्वत:हून आयोगापुढे आले आहेत. त्यांच्या या विनंतीवर भूमिका स्पष्ट करताना आयोगाने या घटनेमागचे सत्य शोधून काढण्यासाठी; तसेच अशा प्रकारच्या घटना भविष्यात घडू नयेत, यासाठी सर्व राजकीय पक्षांच्या साक्षी नोंदविण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. मात्र, या सर्वांच्या साक्षी अंतिम टप्प्यात नोंदविणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले.दरम्यान, घाटकोपर येथील रमाबाई आंबेडकरनगरमधील एका मंडळाचे सदस्य असलेल्या तानाजी साबळे यांनी सोमवारी आयोगापुढे साक्ष नोंदविली. कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला २०० वर्षे पूर्ण झाल्याने तेथे मोठ्या प्रमाणावर जनसमूह येणार, याची खात्री असल्याने येथे दवाखाने, रुग्णवाहिका, अग्निशमन दलाच्या गाड्या, पिण्याच्या पाण्याची सोय व अन्य सुविधा उपलब्ध केल्याचा; तसेच भेट देण्यासाठी व तेथून बाहेर पडण्यासाठी स्वतंत्र मार्गिका केल्याचा दावा सरकारने केला होता. त्यावर त्यांना प्रश्न विचारण्यात आला आणि अशा सुविधा प्रत्यक्षात होत्या का, यावर त्यांची साक्ष नोंदवण्यात आली. त्यावर साबळे यांनी गर्दीत या सुविधांकडे आपले लक्ष गेले नसल्याचे आयोगाला सांगितले.सुमीत मलिक यांचेही म्हणणे नोंदवण्याची मागणीकोरेगाव भीमा चौकशी आयोगाचे सदस्य सुमीत मलिक यांचीही साक्ष आयोगाने नोंदवावी, अशी मागणी प्रकाश आंबेडकरांतर्फे करण्यात आली. घटनेवेळी मलिक राज्याचे मुख्य सचिव होते. त्यामुळे या घटनेची व त्या वेळी राज्य सरकारने केलेल्या कारवाईची माहिती त्यांना आहे. त्यामुळे आयोगाच्या व्यासपीठावरील मलिक यांनी आपली साक्ष नोंदवायला काहीच हरकत नाही, असे म्हणणे त्यांच्यातर्फे मांडण्यात आले.आयोगाचे अध्यक्ष जे.एन. पटेल यांनी आंबेडकर यांना याबाबतचा अर्ज करण्यास सांगितले. त्यावर आयोग पुण्यात सुनावणी घेईल, तेव्हा आपण हा अर्ज करू, असे त्यांनी स्पष्ट केले. आंबेडकर यांचा अर्ज मंजूर झाल्यास मलिक यांना नैतिकदृष्ट्या आयोगाचे सदस्य म्हणून काम पाहता येणार नाही. त्यामुळे सरकारला नव्याने सदस्याची नियुक्ती करण्याची वेळ येऊ शकते. परिणामी, आयोगाचे काम पूर्ण करण्यास विलंब होऊ शकतो.

टॅग्स :Bhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचारnewsबातम्या