कोकण रेल्वे कराडपर्यंत जोडली

By Admin | Updated: February 27, 2015 02:40 IST2015-02-27T02:40:52+5:302015-02-27T02:40:52+5:30

कुछ नया जोडना होगा, कुछ पुराना तोडगा होगा..’ असे सांगत रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी कोकण रेल्वे उर्वरित महाराष्ट्राला जोडली. कराड ते चिपळूण हा ११२ किलोमीटरचा मार्ग

Konkan Railway is connected to Karad | कोकण रेल्वे कराडपर्यंत जोडली

कोकण रेल्वे कराडपर्यंत जोडली

रघुनाथ पांडे, नवी दिल्ली
‘कुछ नया जोडना होगा, कुछ पुराना तोडगा होगा..’ असे सांगत रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी कोकण रेल्वे उर्वरित महाराष्ट्राला जोडली. कराड ते चिपळूण हा ११२ किलोमीटरचा मार्ग जोडण्यासाठी १२०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, यामुळे कोलकाता ते चिपळूण व्हाया पुणे हा नवा रेल्वेमार्ग तयार होणार आहे.
एवढेच नव्हेतर, पुणे - लोणावळा या मार्गावर तिसरा ट्रॅक, पुणे - नाशिक मार्गासह पाच मार्गांचे सर्वेक्षण तर इगतपुरी - भुसावळ या मार्गाच्या तिसऱ्या मार्गासाठी सर्वेक्षण करण्यात येणार आहे.
रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी महाराष्ट्रासाठी १२ हजार २३९ कोटींचे प्रकल्प मंजूर केले. त्यापैकी या वर्षी ४ हजार ३७४ कोटीं रुपयांची तरतूद केली आहे. रेल्वे प्रकल्पात राज्य सरकारचा बरोबरीचा वाटा राहणार असल्याने या प्रकल्पांना गती येण्यासाठी राज्यासोबत रेल्वेला जोडणारी कंपनी असेल, त्यामुळे प्रकल्पातील अडचणी दूर करून कार्यपद्धती व कालबद्धता निश्चित होणार आहे, असे रेल्वमंत्री प्रभू यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
चिपळूण - कराड हा नवा मार्ग करून पुढे कोकण रेल्वे पुण्याशी जोडण्याचा निर्णय घेण्यात आला. ११२ किलोमीटरच्या या मार्गासाठी यंदाच्या वर्षी १२०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. मागच्या रेल्वे अर्थसंकल्पात राज्यासाठी १४७४ कोटींची तरतूद होती, ती यंदा १२९ टक्क्यांनी वाढवून ३३७६ कोटी करण्यात आली. प्रवासी सुविधांसाठी ४४६ कोटी एवढ्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.

मुंबईसाठी ११ हजार कोटी : उपनगरीय रेल्वेचे जाळे बळकट करण्यासाठी मुंबई शहर विकास प्रकल्पाचा (एमयूटीपी )तिसरा टप्पा सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी या अर्थसंकल्पात ११ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यापैकी यंदा १ हजार कोटी रुपयांचा निधी, १ हजार कोटी राज्य सरकार व उरलेली रक्कम बाजारातून उभारण्यात येणार आहे. या माध्यमातून मुंबईत मेट्रोचे जाळे बळकट करण्यात येणार आहे.

> रस्ते संरक्षण कार्य

नागपूर विभागातील केबल, रिले, बूम, सहायक उपकरणांमध्ये बदल- ९० लाख, शेगाव रेल्वे उड्डाण पूल- २ कोटी, काटोल रेल्वे उड्डाण पूल- ६० लाख, नरखेड रेल्वे उड्डाण पूल- १ कोटी ५० लाख, बाबूपेठ रेल्वे उड्डाण पूल- ५ लाख, वर्धा- नागपूर- सिंधीनजीक रेल्वे उड्डाण पूल- ५ लाख, वर्धा - नागपूर- बुटीबोरीनजीक रेल्वे उड्डाण पूल- ५ लाख, बडनेरा- वर्धा फाटक क्र. ७८ आणि ८८ ऐवजी, पर्यायी रस्ता तयार करणे- ५ लाख, वर्धा - नागपूर लूप/ यार्ड- १० लाख, आमला- नागपूर रेल्वे मार्ग नुतनीकरण ७० किमी.- ३ कोटी २५ लाख, नागपूर- वर्धा रेल्वे मार्ग नुतनीकरण ५४ किमी- ६१ लाख, वर्धा- बल्लारशाह रेल्वे मार्ग नुतनीकरण ९.९ किमी- ६३ लाख, भुसावळ- बडनेरा रेल्वे मार्ग नुतनीकरण २४ किमी- ७ कोटी

Web Title: Konkan Railway is connected to Karad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.