कोंडी, वडाळा, मार्डी, बीबीदारफळ गावे आरक्षित
By Admin | Updated: March 28, 2015 01:43 IST2015-03-28T01:43:46+5:302015-03-28T01:43:46+5:30
नान्नज, डोणगाव, अकोलेकाटी सर्वसाधारण : सरपंचपद आरक्षण

कोंडी, वडाळा, मार्डी, बीबीदारफळ गावे आरक्षित
न न्नज, डोणगाव, अकोलेकाटी सर्वसाधारण : सरपंचपद आरक्षणफोटो- सोलापूर : कोंडी, वडाळा, मार्डी, बीबीदारफळ, तिर्हे, कळमण या महत्त्वाच्या ग्रामपंचायतीचे सरपंच आरक्षित झाले असून नान्नज, डोणगाव, अकोलेकाटी ही गावे सर्वसाधारण झाली आहेत.2015-2020 या पाच वर्षांसाठी उत्तर सोलापूर तालुक्यातील 36 गावांच्या सरपंचपदासाठी आरक्षण सोडत शुक्रवारी काढण्यात आली. तहसीलदार हणमंत कोळेकर, नायब तहसीलदार लिना खरात, अव्वल कारकून भंडारी, सभापती सुरेखा पाटील, जि.प.सदस्य महादेव पाटील, सुधीर गोरे, सरपंच र्शीमंत बंडगर, महादेव वाघमारे, नागनाथ रणशूर आदींसह तालुक्यातील बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. विजयकुमार पारसे या 13 लहान मुलाच्या हस्ते चिठ्ठय़ा उचलण्यात आल्या. अनुसूचित जाती महिलेसाठी तेलगाव आरक्षित झाले.अनुसूचित जाती- साखरेवाडी, कोंडी, कौठाळी. अनुसूचित जाती(महिला)-हिरज,कळमण, गावडीदारफळ नागरिकांचा मागास प्रवर्ग(ओबीसी)- भागाईवाडी, शिवणी, बेलाटी, होनसळ, एकरुख-तरटगावओबीसी(महिला)- बीबीदारफळ, तिर्हे, वडाळा, नरोटेवाडी, गुळवंचीसर्वसाधारण महिला- कवठे, तळेहिप्परगा, कारंबा, भागाईवाडी, पाथरी, बाणेगाव, राळेरास, पाकणी, रानमसलेसर्वसाधारण- हगलूर, नंदूर-समशापूर, पडसाळी, डोणगाव, भोगाव, सेवालालनगर, अकोलेकाटी, नान्नज, वांगी, खेड चौकटआरक्षणाला हरकत अन् नोंदीविनाच.तेलगावमध्ये अनुसूचित जमातीचे मतदारच नसताना अनुसूचित जमातीसाठी सरपंचपद आरक्षित करण्यास मोहन लांबतुरे यांनी हरकत घेतली. तहसीलदार कोळेकर यांनी नंतर लेखी द्या असे सांगितले. बीबीदारफळ गावचे सरपंचपद 2005 मध्ये ओबीसीसाठी राखीव होते. या प्रवर्गातील दोघांना प्रत्येकी अडीच वर्षे पद मिळाले, परंतु त्याची नोंदच नाही.