शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

"मी हात जोडले, पाय धरले, पण त्या नराधमाने…’’, कोलकाता बलात्कार प्रकरणातील पीडितेचा धक्कादायक जबाब   

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 11:15 IST

Kolkata Rape Case: कोलकाता बलात्कार प्रकरणातील पीडित तरुणीने दिलेल्या जबाबामधून धक्कादायक माहिती समोर आली आहे.

पश्चिम बंगालची राजधानी असलेलं कोलकाता शहर एका महाविद्यालयात विद्यार्थिनीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेनं हादरलं आहे. कोलकाता येथील एका लॉ कॉलेजच्या आवारामध्ये एका विद्यार्थिनीवर सामुहिक बलात्कार करण्यात आला असून, या प्रकरणी राज्यातील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या युवा कार्यकर्त्यासह तीन जणांना अटक करण्यात आली आहे. कॉलेजचा माजी विद्याथी आणि हंगामी कर्मचारी मनोजित मिश्रा, प्रमित मुखर्जी आणि जेब अहमद अशी या आरोपींची नावं आहेत. दरम्यान, या बलात्कार प्रकरणातील पीडित तरुणीने दिलेल्या जबाबामधून धक्कादायक माहिती समोर आली आहे.

बलात्काराची ही घटना बुधवारी संध्याकाळी ७.३० ते १०.५० च्या सुमारास कॉलेजच्या आवारात घडली. या प्रकरणातील पीडित तरुणी ही कॉलेजच्या राजकीय विश्वात सक्रिय होती. तसेच ती तृणमूल काँग्रेसची समर्थक आहे. तिने पोलिसांना सांगितले की, मी बुधवारी परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी कॉलेजमध्ये गेले होते. इतर विद्यार्थी अर्ज भरल्यानंतर निघून गेले. मात्र मनोजित मिश्रा याने मला आणि इतर सात विद्यार्थ्यांना युनियनच्या खोलीत थांबण्यास सांगितले. तिथे मला त्यांनी बिस्किट दिले. तसेच युनियनमध्ये एका महत्त्वपूर्ण पदावर नियुक्ती करण्याचा प्रस्ताव दिला.

पीडित तरुणी पुढे म्हणाली की, मी कॉलेजच्या युनियनसाठी पूर्णपणे समर्पित आहे. तसेच यूनिटसाठी काम करण्यास तयार असल्याचे त्यांना सांगिकले. त्यानंतर मनोजित मिश्रा मला युनियनच्या रूममधून बाहेर घेऊन गेला. तसेच त्याने माझ्यासमोर लग्नाची मागणी घातली. मात्र मी त्याची ही मागणी धुडकावून लावली. त्यानंतर तो मला जबरदस्तीने सुरक्षा रक्षकांच्या खोलीत घेऊन गेला. ती त्याचा तावडीतून सुटका करण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करत होते. मी त्याच्यासमोर हात जोडले. त्याचे पाय धरले. मला जाऊ देण्यासाठी विनवणी केली. मात्र त्याने मला जाऊ दिले नाही. त्याने मला जबरदस्तीने पकडले. मी तुझी मागणी स्वीकारू शकत नाही. माझा एक बॉयफ्रेंड आहे. तसेच मी त्याच्यावर प्रेम करते, असं मी त्याला सांगितलं. मात्र तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता, असेही पीडितेने सांगितले.

या प्रकरणी पोलिसांनी पीडितेची वैद्यकीय तपासणी केली असून, त्यामधून पीडितेवर बलात्कार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानंतर पोलिसांनी मुख्य आरोपी मनोजित मिश्रा याच्यासह इतर दोघांना अटक केली आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीwest bengalपश्चिम बंगाल