शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

CoronaVirus Live Updates : हृदयस्पर्शी! कोरोनामुळे आईला गमावलं; तब्बल 21 दिवस मृत्यूशी लढत नवजात बाळाने जगण्याचं युद्ध जिंकलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2021 11:46 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates : कोरोनामुळे एका नवजात बाळाने आपल्या आईला गमावलं आहे. यानंतर 21 दिवस मृत्यूशी लढत  बाळाने जगण्याचं युद्ध जिंकल्याची घटना समोर आली आहे. 

नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 3,09,46,074 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 38,792 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 624 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 4,11,408 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान अनेक मन सुन्न करणाऱ्या घटना घडत आहेत. कोरोनाने अनेकांच्या जवळची माणसं हिरावून नेली आहे. तर काहींच्या डोक्यावर आई-वडिलांचं छत्रच हरवलं आहे. अशीच एक हृदयस्पर्शी घटना आता समोर आली आहे. कोरोनामुळे एका नवजात बाळाने आपल्या आईला गमावलं आहे. यानंतर 21 दिवस मृत्यूशी लढत  बाळाने जगण्याचं युद्ध जिंकल्याची घटना समोर आली आहे. 

कोलकातामध्ये ही घटना घडली आहे. एका गर्भवती महिलेला कोरोनाची लागण झाली होती. याच दरम्यान महिलेची प्रकृती अधिकच गंभीर झाली. तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं. आईच्या आणि बाळाच्या जीवाला धोका असल्याने डॉक्टरांनी सी-सेक्शनच्या माध्यमातून महिलेची डिलिव्हरी केली. बाळाचा जन्म झाल्यानंतर काही तासांनीच आईचा कोरोनामुळे मृत्यू झाला. बाळाची प्रकृती देखील गंभीर होती. 21 दिवस व्हेंटिलेटरवर ठेवल्यानंतर आता बाळ पुर्णपणे बरं झाल्याची माहिती मिळत आहे. आता बाळाला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, 31 वर्षीय राखी मंडल विश्वास यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना गर्भवती असताना कोरोनाची लागण झाली होती. मात्र याच दरम्यान त्यांची प्रकृती आणखी बिघडली. डिलिव्हरी नंतर राखी यांचा मृत्यू झाला. बाळाचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. मात्र प्रकृती ही चिंताजनक असल्याने त्याची विशेष काळजी घेण्यात आली. डॉक्टरांनी बाळाला व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवलं आणि काही दिवसांनी हळूहळू बाळाच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचं वृत्त दिलं आहे. 

कोरोनाची तिसरी लाट लवकर येणार?; 'या' 8 राज्यांतील पॉझिटिव्हिटी रेटने वाढवलं टेन्शन, धोक्याचा इशारा

कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत असताना लोकांचा निष्काळजीपणा हा जीवघेणा ठरू शकतो. आठ राज्यातील पॉझिटिव्हिटी रेटने सरकारचं टेन्शन वाढवलं आहे. धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार. तपासणीमध्ये जर पॉझिटिव्हिटी रेट हा दहा टक्क्यांपेक्षा जास्त असेल तर तेथील संक्रमण हे नियंत्रणाबाहेर आहे. तर केरळचा प़ॉझिटिव्हिटी रेट हा 10.5 टक्के आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील तब्बल 73 जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी रेट हा 10 टक्के झाला आहे. ज्यातील 45 जिल्हे हे पूर्वोत्तर राज्यातील आहेत. यामुळेच तज्ज्ञांची विशेष टीम या राज्यांत पाठवण्यात आली आहे. सिक्किम - 19.5%, मणिपूर - 15%, मिझोरम - 11.8%, केरळ - 10.5%, मेघालय - 9.4, अरुणाचल प्रदेश - 7.4%, नागालँड - 6%, त्रिपुरा - 5.6% या राज्यातील पॉझिटिव्हिटी रेटने चिंता वाढवली आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटलDeathमृत्यूIndiaभारतwest bengalपश्चिम बंगाल