शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीशी तडजोड चालणार नाही! राजकीय लेबलं लावू नका, याकडे संकट म्हणून पाहा; राज ठाकरेंनी ठणकावलं
2
"ठाकरे बंधूंच्या ताकदीपुढे सरकारनं माघार घेतली; ही विजयाची पहिली पायरी, यापुढे..."
3
"मराठी बोला तुम्ही मराठी बोला...", मुंबईच्या लोकलमध्ये तरुणाईचा गजर, व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल!
4
येत्या ७ जुलैला सार्वजनिक सुट्टी मिळणार? सोमवारी जाहीर झाली तर काय काय बंद असणार...
5
तेलंगणात रसायनांनी भरलेल्या टँकरचा स्फोट, किमान १० कामगारांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
6
मर्यादेपेक्षाही अधिक महाग होणार चांदी; रॉबर्ड कियोसाकी यांच्या दाव्यात किती तथ्य?
7
दरोडा, खून...महाराष्ट्रासह चार राज्यांमध्ये १६ गंभीर गुन्हे; कुख्यात गुंडाचा उत्तर प्रदेशात एन्काउंटर
8
HDB Financial Services IPO : १२,५०० कोटींचा HDB Financial IPO हिट, बंपर प्रतिसाद; अलॉटमेंट कसं चेक कराल?
9
पुण्यातील लोणी काळभोरमध्ये लागले इराणचे झेंडे, खामेनींचे फ्लेक्स; Video व्हायरल...
10
तुमच्या गृहकर्जाचा हप्ता ४००० रुपयांनी होईल स्वस्त; बँक बदला आणि लाखो रुपये वाचवा! ही आहे पद्धत
11
"मी कितीही स्पष्टीकरण दिलं तरी...", ऐश्वर्यासोबत घटस्फोटाच्या चर्चांवर अभिषेक बच्चनने सोडलं मौन
12
ढगफुटी झाली आणि पूर आला; गाडी नदीत अडकता ड्रायव्हर चढला टपावर, पुढे काय झालं?
13
बँका तुमचं काम करत नाहीयेत, टेन्शन कशाला? RBI नं दिलीये सुविधा; 'इकडे' करू शकता त्यांची तक्रार
14
Ashadh Ritual 2025: आषाढात लेकीला माहेरी बोलावण्याची पूर्वापार प्रथा, केला जातो 'असा' कौतुक सोहळा!
15
Video:"...आता मला काय विचारताय तुम्ही"; एकनाथ शिंदे चंद्रशेखर बावनकुळेंवर का संतापले?
16
रतन टाटांनी करिअरची सुरुवात केलेल्या कंपनीला १००० कोटींची नोटीस! समोर आले धक्कादायक कारण
17
'मला न्याय हवा', खा. चंद्रशेखर यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करणाऱ्या तरुणीचे PM मोदींना पत्र
18
PF मधून पैसे काढायचेत? पहिले जाणून घ्या तुमच्या कंपनीनं केलंय की नाही 'हे' काम? नाहीतर क्लेम होईल रिजेक्ट
19
Job Alert: पाच अशा नोकऱ्या, ज्या येत्या काळात संपून जातील; वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा इशारा
20
कॅनरा बँकेतील सोन्यावर मारला डल्ला, ५३.२६ कोटींची चोरी; शाखा मॅनेजरच निघाला मुख्य सूत्रधार

‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 08:20 IST

दरम्यान या घटनेविरोधात निदर्शने करणाऱ्या भाजपच्या नेत्यांसमवेत शनिवारी रात्री ताब्यात घेतलेले केंद्रीय मंत्री सुकांत मजुमदार रविवारी सकाळी पोलिस मुख्यालयाबाहेर आले.

कोलकाता : कोलकातामधील ज्या महाविद्यालयात सामूहिक बलात्काराची घटना घडली, त्या महाविद्यालयाच्या उपप्राचार्या नयना चटर्जी यांनी म्हटले आहे की, सामूहिक बलात्काराबाबत आम्हाला माध्यमांतूनच कळाले. पोलिसांनी सुरुवातीला ही बाब आम्हाला सांगितली नाही.

त्यांनी सांगितले की, मागील गुरुवारी पोलिसांनी आमच्या परिसरात प्रवेश करण्याची परवानगी मागितली. त्यांची भेट गोपनीय होती. पोलिसांनी दोन खोल्या सील केल्या. या घटनेनंतर पीडितेने किंवा कुटुंबीयांपैकी कोणीही आमच्याशी संपर्क साधला नाही. 

दरम्यान या घटनेविरोधात निदर्शने करणाऱ्या भाजपच्या नेत्यांसमवेत शनिवारी रात्री ताब्यात घेतलेले केंद्रीय मंत्री सुकांत मजुमदार रविवारी सकाळी पोलिस मुख्यालयाबाहेर आले.

राष्ट्रीय महिला आयोग महाविद्यालयात

राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्या अर्चना मजुमदार रविवारी साऊथ कोलकाता लॉ कॉलेजमध्ये दाखल झाल्या. आम्ही पीडित विद्यार्थिनीच्या बाजूने उभ्या असून, ती सध्या कुठे आहे, याची माहिती पोलिस देऊ शकले नाहीत. आम्ही तिला मदत करू इच्छित आहोत. आयोगाकडील चौकशीचा हा एक भाग आहे. यावेळी पोलिस अधिकाऱ्यांशी त्यांचा  वादही झाल्याचे सांगण्यात येते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी