Kolkata earthquake: पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथे शुक्रवारी सकाळी भूकंपाचा धक्का बसला. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ५.६ इतकी होती. त्याचा केंद्रबिंदू शेजारच्या बांगलादेशातील तुंगी येथे होता. भूकंपाचा हादरा बसल्याने घाबरून लोक घराबाहेर पडले. सकाळी १० वाजून १० मिनिटांनी हा भूकंप जाणवला. हा भूकंप बांगलादेशातील तुंगीपासून पूर्वेकडे २७ किलोमीटर अंतरावर होता. त्याची खोली १० किलोमीटर असल्याचे वृत्त आहे. हा भूकंप कोलकाता आसपासच्या जिल्ह्यांमध्ये आणि उत्तर बंगालमध्ये जाणवला. कूचबिहार आणि दिनाजपूरमध्येही जोरदार भूकंपाचे धक्के जाणवले.
भूकंपाची तीव्रता जोरदार असली तरी राज्यात कुठेही नुकसान झाल्याचे वृत्त नाही. भूकंपाच्या वेळी रस्त्यावर, प्रवासासाठी निघालेले किंवा प्रवासात असलेल्या लोकांना हा भूकंप जाणवला नाही. पण घरातील पंखे हलले आणि काही अंशी जमीन थरथरत होती. घाबरून बाहेर पडणारे लोक काही वेळाने पुन्हा आपल्या घरी परतले. त्यामुळे आता जनजीवन सामान्य आहे.
आज पहाटे पाकिस्तानात भूकंप
यापूर्वी, आज पहाटे पाकिस्तानमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले होते. पहाटे ३ वाजून ०९ मिनिटांनी झालेल्या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ५.२ इतकी होती. भूकंपाचे केंद्र पाकिस्तानमध्ये सुमारे १३५ किलोमीटर खोलवर होते. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या मते, गुरुवार-शुक्रवार रात्री हिंदी महासागरातही भूकंप झाला, ज्याची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.३ होती. अफगाणिस्तानातही भूकंपाचे धक्के जाणवले, भूकंपाचे केंद्र पृथ्वीच्या पृष्ठभागापासून १९० किलोमीटर खोल होते. त्याची तीव्रता ४.२ इतकी मोजण्यात आली. टेक्टोनिक प्लेट्सच्या टक्करमुळे निर्माण होणारी ऊर्जा बाहेर पडण्याचा मार्ग शोधत असल्यानेच पृथ्वीवर भूकंप जाणवतात, असे जाणकारांचे मत आहे.
Web Summary : Kolkata experienced earthquake tremors measuring 5.2 on the Richter scale. The epicenter was in Bangladesh. People panicked and rushed outdoors. No damages were reported in Kolkata. Tremors also felt in Pakistan and Afghanistan.
Web Summary : कोलकाता में 5.2 तीव्रता के भूकंप के झटके महसूस किए गए। केंद्र बांग्लादेश में था। लोग डरकर बाहर भागे। कोलकाता में किसी नुकसान की खबर नहीं है। पाकिस्तान और अफगानिस्तान में भी झटके महसूस किए गए।